निजामपूरातील पाच वर्षांच्या चिमुकली अनाबियाचा रमजानचा पहिला उपवास; सर्वत्र होतेय कौतुक..

 


साक्री प्रतिनिधी / अकिल शहा: मुस्लीम समाजातील पवित्र रमजान महिना लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपवास(रोजा) नमाज आणि इबादत करण्यासाठी सक्तीचा (फर्ज) मानला जातो. निजामपूर येथील अवघ्या पाच वर्षांची चिमुकली अनाबिया अझहर शेख हिने एक दिवसाचा उपवास (रोजा) पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अनाबिया साक्री तालुक्याती एडवोकेट अझहर शेख यांची कन्या असून इतक्या लहान वयात रमजानच्या पवित्र महिन्याचे महत्त्व समजून घेत उपवास धरण्याचा तिचा प्रयत्न कौतुकास्पद मानला जात आहे. कुटुंबियांनी सांगितले की, घरातील धार्मिक वातावरण आणि रमजानचे संस्कार यामुळे अनाबियाने स्वतःहून उपवास धरण्याची इच्छा व्यक्त केली.

रोजा पूर्ण केल्यानंतर कुटुंबीय व नातेवाईकांनी तिचे अभिनंदन केले. परिसरातील नागरिकांनीही अनाबिया चे कौतुक करत तिला आशीर्वाद दिले. लहान वयात धार्मिक मूल्यांची जपणूक आणि संयमाचे पालन करण्याचा तिचा हा प्रयत्न प्रेरणादायी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केले.

रमजान महिना हा संयम, त्याग, दानधर्म आणि आत्मशुद्धीचा संदेश देणारा पवित्र महिना आहे. अशा वातावरणात अनाबिया सारखी चिमुकली ने दाखवलेली जिद्द व श्रद्धा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे अशी भावना निजामपूरातील मुस्लीम समाजाने व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post