नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील वॉटर इंजिनिअर रिजवान बागवान यांचा विशेष गौरव...

 


नंदुरबार /प्रतिनिधी

नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालय व जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेले वॉटर इंजिनिअर (प्लंबर) रिजवान अहमद बागवान यांचा त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी विशेष गौरव करण्यात आला.



रिजवान बागवान हे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय परिसरात पाण्याचे योग्य नियोजन, नियमित व सुरळीत पाणीपुरवठा तसेच अखंडित सुविधा उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय सेवांची दखल घेत ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

हा गौरव जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. निलेश तुमराम, डॉ. अरुण जामकर, डॉ. प्रवीण ठाकरे, डॉ. तुषार पटेल, डॉ. हरिश्चंद्र गावीत, डॉ. अश्विन कुमार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

रुग्णालयातील मूलभूत सुविधांमध्ये पाणीपुरवठ्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, रिजवान बागवान यांच्या निष्ठावान व जबाबदार कार्यामुळे रुग्ण, नातेवाईक व कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post