मोराणे प्रतिनिधी/ प्रकाश नाईक : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय मोराणे येथील स्पर्धा परीक्षा व प्लेसमेंट सेल आहेत बायोडाटा प्रेपरेशन वर्कशॉप मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंतर्गत गुणवत्ता समितीचे समन्वयक प्रा. डॉ. दिलीप घोंगडे यांनी वरील मत व्यक्त केले. पुढे बोलताना त्यांनी ओपन मार्केटमध्ये स्पर्धा करीत असताना आपला CV अद्यावत असणे व त्या त्या संस्था कार्यालयाच्या संदर्भातली माहिती तंतोतंत असणे आणि विविध कौशल्य जसे संवाद कौशल्य, संगणक कौशल्य, भाषा कौशल्य, सादरीकरण कौशल्य, इत्यादी हेच उज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे अशी आग्रही मांडणी केली.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. डॉ. रघुनाथ महाजन यांनी विविध संस्था कार्यालयामध्ये मुलाखतीला जाताना अद्यावत ज्ञान कौशल्याची नितांत गरज आहे तसेच प्रकल्प प्रस्ताव तयार करणे, अद्यावत ज्ञान कौशल्याने परिपूर्ण असणे इत्यादी बाबीवर आपले परखड मत व्यक्त केले.
कार्यशाळेच्या प्रस्ताविके मध्ये स्पर्धा परीक्षा व प्लेसमेंट सेल चे समन्वयक प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी कार्यशाळेचे उद्देश मांडताना महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अद्यावत ज्ञान कौशल्य संपादन करणे तसेच आपल्याकडे असलेल्या विविधांगी ज्ञान कौशल्याच्या माध्यमातूनच भविष्यामध्ये चांगली नोकरी प्राप्त होऊ शकते यासाठीच सदरील कार्यशाळा आयोजित केली आहे अशी मांडणी केली. कार्यशाळेसाठी बीएसडब्ल्यू अंतिम वर्ष आणि एम एस डब्ल्यू द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यशाळेचे सूत्रसंचालन दीप्ती चिकाटे यांनी केले तर शेवटी कार्यशाळेत उपस्थित मान्यवरांचे आभार तुषार झालसे यांनी मानले.

