श्रमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा..


 साक्री प्रतिनिधी / अकिल शहा: दि. १९ फेब्रुवारी २०२६, गुरुवार रोजी श्रमिक विद्यालय, छडवेल प. ता. साक्री येथे प्रौढप्रताप पुरंदर, महापराक्रमी, रणधुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जे. यू. मराठे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी रयतेच्या राजाला अभिवादन करत जयघोष केला.

इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित मनोगते व्यक्त करत आपल्या विचारांतून शिवरायांविषयी आदरभाव प्रकट केला. श्री. एस. वाय. पाटील सर यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम व कर्तव्यनिष्ठेचा संदेश दिला.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री. जे. यू. मराठे यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांचा इतिहास रोमांचकारी पद्धतीने समजावून सांगत, “जीवनात प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करावी,” असे मार्गदर्शन केले.

या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यालय परिसरात उत्साह व देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

Post a Comment

Previous Post Next Post