नंदुरबार / प्रतिनिधी :वाघाळे (ता. नंदुरबार), दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सामाजिक बांधिलकी जपत भावी पंचायत समिती सदस्य ॲड. प्रकाश गांगुर्डे यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला.
वाघाळे गावातील पाटील गल्ली, भरड गल्ली, पवार गल्ली तसेच सावर गल्ली परिसरातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर लेखनासाठी आवश्यक पॅड, पेपर व इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची अडचण भासू नये व त्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे ॲड. प्रकाश गांगुर्डे यांनी सांगितले.
“विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन गावाचे व परिसराचे नाव उज्ज्वल करावे,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.
शिक्षण क्षेत्राला दिलेल्या या हातभारामुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून सामाजिक कार्याबद्दल ॲड. प्रकाश गांगुर्डे यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.


