साक्रीत माता रमाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी...



साक्री प्रतिनिधी / अकिल शहा:दि. 07/02/2026 रोजी माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती निमित्ताने साक्री शहरातील बुद्ध विहार आदर्श नगर येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख व्याख्याते आयुष्यमती उषाताई शिरसाठ मॅडम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

                         या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हूणन वार्ड क्रमांक ४ चे नगरसेवक श्री प्रवीण निकुंबे हे होते तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट साक्री तालुकाध्यक्ष श्री कमलाकर मोहिते,उपतालुकाध्यक्ष श्री विनोद वाघ सचिव श्री मेघराज पिंपळे, शाखा प्रमुख श्री मधुकर वाघ ,उत्तर महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य श्री हेमंत वाघ ,प्रा. डाँ. कैलास वाघ प्रा. सावळे सर, डी.एम.मोहिते सर ,जे. डी.वाघ सर, वेंदे सर, बच्छाव आप्पा तसेच सगळे बहुजन समुदाय उपस्थित होता.

                  या कार्यक्रमाचे आयोजन माता रमाई महिला बचत गट भारतीय बुद्ध महासभाने केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post