साक्री तालुक्यात जलजीवन मिशनमध्ये गैरव्यवहार? सामाजिक कार्यकर्त्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार;कैलास भदाणे व गिरीश नेरकर यांची एसीबीद्वारे चौकशीची मागणी..!

 



साक्री प्रतिनिधी /अकिल शहा :साक्री तालुक्यात "हर घर जल" ही योजना कधी पोहोचणार ?( ACB मार्फत चौकशी करा) 

साक्री तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. तालुक्यात एकाही गावाने लोकवर्गणी भरली नाही मग ही लोक वर्गणी ठेकेदारांनी का भरली...? 

जल जीवन पाणीपुरवठा योजना ही *केंद्र सरकार 45% तर राज्य सरकार 45% व लोक वर्गणी 10%* या पद्धतीने ही योजना लागू आहे मात्र या योजनेला अनेक ठिकाणी हरताळ फासले गेले आहे असे दिसते साक्री तालुक्यात एकूण *कार्यादेश मंजूर 203 योजना आहेत मंजूर योजनेंपैकी 80 टक्के योजना या अपूर्ण आहेत तर 20 टक्के योजना पूर्ण झाल्या असल्याचे दिसते* मात्र तिथेही सुरळीत आणि नियमित पुरवठा गावांना होत नाही गेल्या पाच वर्षापासून या योजनेचे कार्यादेश दिले गेले असताना अजूनही काही ठिकाणी कामाला प्रारंभ झालेला नाही यामुळे नागरिकांना वेठीस धरण्याचे काम कोण करत आहे हा संशोधनाचा भाग आहे कारण ग्रामपंचायत ठेकेदारांकडे कडे बोट दाखवते व ठेकेदार अधिकाऱ्यांकडे बोट दाखवतात हा सर्व प्रकार अतिशय निंदनीय आहे काही योजना तर अधिकारीच करत असल्याचे ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे या सर्व प्रकारामुळे सदर योजनेचे उद्दिष्ट फसले आहे असे दिसत आहे.*अनेक ग्रामपंचायतींचे उत्पन्न शून्य आहे अशा ग्रामपंचायती कोट्यावधींच्या योजनेचे देखभाल दुरुस्ती कसं करतील कारण ते दहा टक्के लोक वर्गणी गोळा करू शकत नाही व कोणीही लोकवर्गणी देत नाही हा प्रश्न फार गंभीर आहे* कोणीतरी ठेकेदार दहा टक्के लोक वर्गणी आज भरून देईल व त्याचे बिल काढून या योजना माथी पडतील कोट्यावधींच्या योजना घेतल्यानंतर ग्रामपंचायतीकडून देखभाल दुरुस्ती व लाईट बिल भरले जाणार नाही व त्या तशाच धुळखात पडून राहतील यापूर्वीही तालुक्यात भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेचे असेच झाले होते ठेकेदार अधिकाऱ्यांचे भले झाले मात्र नागरिक ताणलेलेच राहिले योजनेचे असेच होणार अडीचशे तीनशे कोटी रुपये वाया जातील की काय हा प्रश्न नागरिकांसह अनेकांना पडला आहे अनेक सरपंचांना व गावकऱ्यांना माहितीच नाही की आपल्या गावात दोन-तीन कोटीची योजना मंजूर आहे ते आश्चर्य व्यक्त करतात कारण आम्ही मागणीच केली नाही तर योजना मंजूर कशी झाली अनेक ग्रामपंचायतींना आज दिनांक 05-02-2026 पर्यंत सदर योजनेचे कार्यादेश ग्रामपंचायतिंकडे नाहीत सदर कार्यादेश फक्त ठेकेदारांकडेच आहेत सरपंच ग्रामपंचायत म्हणते आमच्याकडे कुठलेही माहिती नाही मात्र त्या गावात सदर योजनेचे काम चालू आहे ही शोकांतिका आहे साक्री म्हणून तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेची पूर्ण तीन तेरा वाजले आहेत यावरून दिसत आहे सदर योजनेचे एक वर्ष सुरळीत चालवण्याची जबाबदारी व पाच वर्षे देखभाल दुरुस्ती जबाबदारी ही ठेकेदाराची आहे मात्र काही ठिकाणी काही घाईगडबडीत काम अपूर्ण असताना सदर योजना या ग्रामपंचायतीकडे हॅण्ड ओव्हर किंवा ताब्यात देण्याचे काम चालू असल्याचे दिसत आहे कारण लवकर ग्रामपंचायतकडे ताब्यात दिल्यानंतर देखभाल दुरुस्ती चे कालावधी कमी राहील म्हणून अपूर्ण योजना ताब्यात देण्याची लगीन घाई चालू आहे .अनेक ठिकाणी पाईप व पाण्याचे टाक्या गळती आहेत काही ठिकाणी छोट्या मोठ्या धरणांमध्ये पाईप सोडून मोटारी टाकले आहेत व पाईपलाईन वरतीच आहेत अनेक गावांमध्ये सिमेंट काँक्रीटचे रोड खोदून पाईप टाकण्यात आले मात्र ते व्यवस्थित केले नसल्याने सदर पाईप लाईन टाकलेल्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे व काँक्रीटच्या व सिमेंट ब्लॉक उघडल्यामुळे अनेक गावातील नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे अनेक वाहन सदर खड्ड्यांमुळे घसरून पडत आहेत नागरिकांना पायी चालण्यासाठी ही कठीण झाले आहे दोन ते तीन वर्षे होऊनी सदर पाईपलाईनचे ठिकाणी रस्त्यांचे काम झाली नाही त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे तक्रार करावी तर कुठे हा प्रश्न नागरिकांपुढे पडला आहे अधिकारी सह लोकप्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देतात यामुळे नागरिकांना तोंड दाबून बुक्कीचा मार सहन करावा लागत आहे *तालुक्यातील एका गावात तीन वेळा विहीर खोदूनही पाणी लागलं नाही मग भूजल विभाग झोपेत दाखला देते का* भूजल तज्ञ करतात कधी काय तीन-तीन वेळा जर विहीर फेल जात असतील तर आपलं भूजल विभाग संपूर्ण फेल आहे असे दिसत आहे का फक्त इस्टिमेट वाढवण्यासाठी पुढे पाच-सहा किलोमीटर विहीर खोदून मंजुरी घेण्यासाठी व अधिकचे पैसे मिळावे म्हणून वाढीव मंजुरीसाठी मंत्रालयात पाठवल्याचे काम चालला आहे का ? वारंवार इस्टिमेट वाढवण्याची गरज काय लोकप्रतिनिधी अधिकारी ठेकेदार यांच्या संगणमताने आर्थिक देवाण-घेवाण तर नाही ना कारण पाच पाच वर्षे योजना जर पूर्ण होत नसतील तर या योजनेचा उपयोग काय अनेक ठिकाणी हर घर जल योजना ही फेल झालेली आहे अनेक राज्यात अनेक अधिकाऱ्यांना घरी जावं लागत आहे मात्र साक्री तालुक्यात सर्वच चिडीचूप झाले आहेत ही मोठी शोकांतिका आहे सदर मंजूर 203 योजना या मे 2026पर्यंत ही पूर्ण होतील का नाही ही शंका आहे *एका गावातील एक कोटीची योजना फेल गेली आहे कारण सदर गावात पाणी उपलब्ध असतानाही पाच किलोमीटर वरून पाईपलाईन करून पाणी आणण्यात गोड बंगाल काय* ? कारण त्या गावात पाण्याची टाकी नाही वितरण व्यवस्था नाही मग पाच किलोमीटर वरून पाणी आणून गावात सोडून द्यायचं मग गावकरी पाणी मुठीत घेऊन येतील का हा प्रश्न सर्वसामान्य अडाणी लोकांना पडला आहे कारण वितरण व्यवस्था पाणी टाकीज जर नाही तर पाच किलोमीटर वरून पाणी आणून काय फायदा फक्त कोट्यावधीचे इस्टिमेट करून लाभ मिळवण्यासाठी अधिकारी व ठेकेदार या योजनेचा उपयोग करत आहेत असं प्रथम दर्शनी तरी वाटत आहे सर्व योजनांचे लोक वर्गणीची यादी ही ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर लावावी म्हणजे कळेल कोणी कोणी लोक वर्गणी करून या योजनेसाठी योगदान दिले आहे .

म्हणून या सर्व योजनेची एसीबी मार्फत चौकशी करून नागरिकांना न्याय द्यावा ही विनंती. 

कैलास मोठाभाऊ भदाणे सामाजिक कार्यकर्ते व गिरीश नेरकर यांनी आपल्या ई-मेल द्वारे मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post