प्रामाणिक सेवेचा गौरव; राजू जाधव यांच्या पीएसआय पदोन्नतीचा विशेष सोहळा...

 


साक्री प्रतिनिधी / अकिल शहा: धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक,कार्यालयाच्या आदेशाने व तसेच राज्यात गृह विभागात स्थापन करण्यात आलेल्या सुकाणु समितीच्या निर्णयानुसार पोलिस दलात एकूण ३० वर्ष सेवा दिलेल्या व तसेच सहायक पोलिस उप निरीक्षक पदावरती किमान ३ वर्ष सेवा पूर्ण केलेल्या एकून १० सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) यांची पोलिस उप निरीक्षक पदी असलेल्या पदोन्नती कऱण्यात आली.त्याप्रमाणे साक्री पोलिस ठाण्यात असलेले कर्तव्यदक्ष सहायक पोलिस उप निरीक्षक राजू जाधव गेली तीन दशके खाकी वर्दीचा मान राखत जनसेवेचे व्रत प्रामाणिकपणे जोपासणारे, साक्री पोलीस ठाण्यातील म्हसदी बीटचे अंमलदार राजू जाधव यांना त्यांच्या प्रदीर्घ ३० वर्षांच्या सेवेचे यथोचित फळ मिळाले. नुकतीच त्यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी पदोन्नती झाल्याने साक्री पोलीस ठाण्यात एका विशेष सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला.


याप्रसंगी साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (PI) दीपक वळवी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) विकास शेवाळे यांनी जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले. या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते जाधव यांचे मामा तथा सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक (DYSP) ज्यांच्या उपस्थितीने हा सोहळा अत्यंत भावूक झाला.

केवळ पोलीस दलातच नव्हे तर जनतेतही जाधव यांनी कमावलेला विश्वास यावेळी दिसून आला. साक्री पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष रवींद्र बेडसे, म्हसदीचे पोलीस पाटील प्रमोद निकम, पोलीस मित्र रामा दादा देवरे आणि सेतू सेवा केंद्राचे रवींद्र निकम यांनी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने जाधव यांचा विशेष सत्कार केला.

३० वर्षांच्या प्रवासात अनेक चढ-उतार पाहिलेल्या जाधव यांनी आपल्या भाषणात सर्वांचे आभार मानले. "हा सन्मान माझ्या कष्टाचा नसून मला साथ देणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याचा आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राजू जाधव यांना एएसआय पदा वरून पीएसआय पदाचा दर्जा मिळाल्याने मित्र परिवार,नातेवाईक व तसेच सहकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून आनंद व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post