सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यालगतच्या बाजूला साईट पट्टी त्वरित भरा अन्यथा येत्या दहा दिवसांत चक्काजाम आंदोलन करू; शेवाळीतील ग्रामस्थांचा प्रशासनाला निवेदन देत इशारा...

 


साक्री प्रतिनिधी / अकिल शहा: मौजे शेवाळी (दा) ता.साक्री येथे गावाच्या बस स्टँड पासुन दातर्ती गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनविण्यात आला परंतु या रत्यालगतच्या बाजुला साईडपट्ट्या भरण्याचा विसर पडला की काय? असा प्रश्न शेवाळीतील ग्रामस्थांना पडला आहे परिणामी त्या ठिकाणी वास्तव्यास राहणाऱ्या ग्रामस्थांना धुळीचा व तसेच वाहन रहदारीसाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे याबाबत संबंधीत सा.बा.विभागाला वेळोवेळी तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधीत सा.बा. विभागाने येत्या १० दिवसात रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईडपट्टी त्वरित भराव्या अन्यथा शेवाळीतील ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरती रसत्यावर बसून रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. साक्री येथील सा.बा.विभागास १६ फेब्रुवारी सोमवारी रोजी ग्रामस्थांनी कार्यालयास निवेदन सादर केले या वेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी ते स्विकारले.उप अभियंता राकेश पाटील शासकीय कामानिमित्त धुळे डिविजन गेले असल्या कारणाने यामुळे ग्रामस्थांनी त्यांच्याशी दुरध्वनी द्वारे संपर्क साधून संबंधित विषयी विचारणा केली त्यांनी येत्या दोन-तीन दिवसात सिमेंट काँक्रीटच्या लगतच्या बाजूला असलेल्या साईट पट्ट्या भरण्याचे काम करुन देणार असे आश्वासन दिले.

निवेदनावर दीपक साळुंके, साहेबराव साळुंके, नथ्थू साळुंके, सुभाष साळुंके, सुरेश साळुंके, संजय साळुंके, शिवाजी साळुंके, अरविंद साळुंके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post