मुंबई / प्रतिनिधी :
नंदुरबार तालुक्याच्या वतीने समाजोपयोगी उपक्रमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महत्त्वाची मदत देण्यात आली. नंदुरबार तालुका विधायक समिती, नंदुरबार यांच्या वतीने आमदार चंद्रकांतजी रघुवंशी आणि नंदुरबारच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. रत्नाताई रघुवंशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे ₹21,00,000 (एकवीस लाख रुपये) इतक्या रकमेचा धनादेश सुपूर्द केला.
ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात येणार असून, गरजू व आपत्तीग्रस्त नागरिकांना मदतीसाठी उपयोगात आणली जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाबद्दल नंदुरबार तालुका विधायक समिती, आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि नगराध्यक्षा रत्नाताई रघुवंशी यांचे मनापासून आभार मानले.
नंदुरबार तालुक्याने सामाजिक जाणीव ठेवत राज्याच्या कल्याणकारी उपक्रमांना दिलेले हे योगदान निश्चितच प्रेरणादायी असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
