निशात हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा जल्लोष; ‘आनंद बाजार’ उपक्रमाने निर्माण केले स्वावलंबनाचे व्यासपीठ..!




 शहादा प्रतिनिधी /शेख अहमद 

निशात हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कुकडेल शहादा तसेच ए. झेड. अन्सारी प्राथमिक शाळा येथे शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी आयोजित ‘आनंद बाजार’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि आनंदी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

या आनंद बाजाराचे उद्घाटन संस्थेचे संचालक व मान्यवरांच्या हस्ते केक कापून तसेच आकाशात फुगे सोडून करण्यात आले. कार्यक्रमाला नगरसेविका डॉ. बतुल नाजीम, डॉ. नाजिम मन्सूरी, संगणक शिक्षिका मोनिका हर्षल पाटील, प्रा. हर्षल लीलाचंद पाटील, आयडियल जुनियर कॉलेजच्या प्राचार्या पठाण अंजुम रशीद मॅडम, सरसय्यद हायस्कूलचे संगणक शिक्षक शोएब नासिर सैय्यद आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच संस्थेचे अध्यक्ष अन्सारी रियाज अहमद मोहम्मद युसुफ, संचालक हाजी निहाल अहमद, नजीर अहमद अब्दुल जब्बार, अन्सारी शाकीर अहमद अब्दुल जब्बार व संचालिका अकीला बानो मोहम्मद अन्सारी यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.




उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, उद्योजकतेचे महत्त्व व स्वावलंबनाबाबत मार्गदर्शन केले. आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले बकेट चाट, वडापाव, भेळ, पाणीपुरी, समोसा, ढोकळा, केक, फालुदा, लाडू, रगडा पॅटीस, व्हेज रोल, इडली-डोसा, चिवडा, डोनट, मसाला पान, फळांचे रस, आईस्क्रीम, कुल्फी आदी विविध चविष्ट खाद्यपदार्थ आकर्षक पद्धतीने सादर केले होते.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना खरेदी-विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. संपूर्ण शाळा परिसरात उत्साह, चैतन्य आणि आनंदाचे वातावरण पसरले होते. आनंद बाजारामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, संघभावना, व्यवहारकौशल्य व आत्मविश्वास वृद्धिंगत झाला.

शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक दृष्टिकोनातून हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अन्सारी आसिफ हुसेन यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या संपूर्ण उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक माननीय अन्सारी अकरम सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post