पैसे घ्या अन् पैसे द्या,केस रफादफा;धडगांव पोलीस ठाणे अंमलदार व पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्याची बिरसा फायटर्सची मागणी..

 


नंदूरबार जिल्हा चिप ब्युरो प्रतिनिधी/सोनू गावीत: घर जाळल्याची फिर्याद घेण्यासाठी फिर्यादीकडून ४३ हजार रूपये घेणा-या पोलीस ठाणे धडगांव येथील ठाणे अंमलदार व पोलीस उपनिरीक्षक यांची सखोल चौकशी करून तात्काळ सेवेतून निलंबित करा,या मागणीचे स्मरणपत्र निवेदन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना देण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,प्राध्यापक सा-या पाडवीदिनेश वसावे,मंगल वसावे,वमा-या वसावे,रोता वसावे,अशोक तडवी,धर्मा वसावे,कैला वसावे,धनजी वसावे,विटला वसावे,सायसिंग वसावे, ईश्वर वसावे,विलास वसावे, गुलाबसिंग वसावे, सह २० कार्यकर्ते उपस्थित होते.यापूर्वीही २ वेळा बिरसा फायटर्स संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार व पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना याबाबत निवेदन देण्यात आले होते.परंतू तक्रार देऊन ६ महिने उलटूनही अद्याप याबाबत वरिष्ठ पोलिसांनी धडगांव पोलिसांवर कोणत्याच प्रकारची कारवाई न केल्यामुळे व संघटनेला चौकशी अहवाल न दिल्यामुळे सुशिलकुमार पावरा यांनी पोलिस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्या कामगिरीवर शंका उपस्थित केली आहे.






                    तक्रार निवेदनात म्हटले आहे की,"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे.या ब्रीदवाक्याचा अर्थ होतो की,महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास व दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहे.परंतू या ब्रीदवाक्याला धडगांव पोलीस ठाण्यातील पोलिसांनी काळीमा फासला आहे.धडगांव तालुक्यातील बिजरी या गांवातील फिर्यादी विलास तडवी या आदिवासी फिर्यादीकडून घर जाळल्याची फिर्याद नोंद करण्यासाठी धडगांव पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार व पोलीस उपनिरीक्षक यांनी ४३ हजार रूपये लूटमार करणा-या धडगांव पोलीस ठाण्यातील संबंधित पोलिसांची सखोल चौकशी करून तात्काळ निलंबित करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांच्याकडे करण्यात आली होती.दत्ता पवार यांनी धडगांव पोलीस ठाण्यातील सीसीटिव्ही फुटेल तपासल्यावर पोलिसांनी फिर्यादीकडून ४३ हजार रूपये घेतल्याचे सत्य उघड झाले.पोलिसांवरची कारवाई दाबण्यासाठी संबंधित पोलिसांनी फिर्यादी विलास तडवी यांना ४३ हजार ऐवजी १ लाख रूपये देवून तोंड दाबण्याचे काम केले. सर्वसामान्य जनतेची पोलिसांकडून अशा प्रकारची लूटमार थांबली पाहिजे.

Post a Comment

Previous Post Next Post