स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना कोठलीत अभिवादन....

 



कोठली / प्रतिनिधी :शहादा तालुक्यातील मौजे कोठली येथे युवकमित्र परिवार कोठली संचलित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना कार्यालयाच्या वतीने थोर समाजसुधारिका व पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आसाराम दयाराम माळी, अमोलकाका पाटील तसेच प्रा. ज्ञानेश्वर गवळे उपस्थित होते. कार्यक्रमास गावातील नागरिक, युवक तसेच बालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

यावेळी प्रा. ज्ञानेश्वर गवळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी कार्याचा आढावा घेत स्त्री शिक्षणाचे महत्व, सामाजिक समता व स्त्री-पुरुष समानतेचे विचार प्रभावीपणे मांडले. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची जी चळवळ उभी केली, ती आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमप्रसंगी संस्थेच्या सचिव कविताबाई माळी, चंदनआजी कोळी, डेटा एन्ट्री ऑपरेटर महेश माळी, तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आसाराम माळी, सुरेश महाजन व युवा कार्यकर्ते अमोलकाका पाटील, मनोहर वारूडे, राकेश माळी, स्वप्नील माळी, मयूर माळी, वसंत गवळे यांच्यासह बालके उपस्थित होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे स्वयंसेवक गोपाल अजबसिंग गिरासे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post