शेवाळीत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा;इयत्ता पहिलीचा फरहान शहा याचे दमदार भाषण, ५०० रुपयांचा पुरस्कार...


साक्री प्रतिनिधी/अकिल शहा
दि. २६ जानेवारी रोजी शेवाळी (दा.), ता. साक्री येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेवाळी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात माजी सैनिक शशिकांत साळुंके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.




जिल्हा परिषद केंद्र शाळेतील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वैभव साळुंके उपस्थित होते. शिवाजी माध्यमिक विद्यालय येथे गावाच्या प्रथम नागरिक सरपंच मंगलाताई भदाणे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण पार पडले.
जिल्हा परिषद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब सोनवणे यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले. यावेळी विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या संविधानाची प्रतिज्ञा, राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर केले. तसेच ‘साक्षर भारत’ आणि ‘तंबाखूमुक्त भारत’ या विषयांवर सार्वजनिक प्रतिज्ञा घेण्यात आली.
शेवाळी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा ही नेहमीच प्रगतीशील व प्रयोगशील शाळा म्हणून ओळखली जाते. येथील विद्यार्थी मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये आत्मविश्वासाने भाषणे सादर करतात, याचा प्रत्यय प्रजासत्ताक दिनी पुन्हा एकदा आला.
इयत्ता पहिलीचा विद्यार्थी फरहान अकिल शहा याने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट भाषण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी कोणत्याही बाबतीत कमी नाहीत, हा आदर्श त्याने गावकऱ्यांसमोर उभा केला. प्रमुख पाहुणे डॉ. वैभव साळुंके यांच्या वतीने फरहान शहा याला उत्कृष्ट भाषण पुरस्कार म्हणून ५०० रुपये रोख रक्कम देण्यात आली. हा पुरस्कार शाळेच्या इयत्ता पहिलीच्या वर्गशिक्षिका प्रतिभा साळुंके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास ग्राम सुधार मंडळाचे आजी-माजी अध्यक्ष, सचिव व सदस्य, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच व सदस्य, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, आशा व अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, भजनी मंडळ, विविध सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक नानासाहेब सोनवणे यांच्यासह शिक्षिका प्रतिभा साळुंके, चंदनबाई सोनवणे, सुनंदा सोनवणे, भारती बेडसे, वसंत तोरवणे, चित्रंगा भावसार आदींनी विशेष परिश्रम घेतले.





Post a Comment

Previous Post Next Post