सासरच्या जाचाला कंटाळुन विवाहीतेची आत्महत्या ; सासु सास-यांसह नवरा अटकेत...

 


साक्री प्रतिनिधी/ अकिल शहा:दिनांक २४/०१/२०२६ रोजी निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील गुलतारा ता.साक्री गावातील विदया राजेंद्र बागुल वय-२० वर्षे हिने सासरच्या त्रासाला कंटाळुन शेतात राहत्या घरासमोरील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्यावरुन मयताचे वडील श्री. काळु आत्माराम चौरे रा. काकसेवड ता.साक्री यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन गुरन-०१३/२०२६ भा.न्या.सं.क.८०,१०८,११५(१) ३५२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता गुन्ह्यातील आरोपी नामे १) पती - राजेंद्र पांडु ऊर्फ पांडुरंग बागुल २) सासरे- पांडु ऊर्फ पांडुरंग बागुल ३) सासु- अन्नपुर्णाबाई पांडु ऊर्फ पांडुरंग बागुल सर्व रा. गुलतारा ता. साक्री यांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यांना दिनांक २५/०१/२०६ रोजी मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि/मयुर एस. भामरे करीत आहेत.


सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे. मा.डॉ. अजय देवरे, अप्पर पोलीस अधिक्षक, धुळे, मा.एस.आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि/श्री. मयुर एस. भामरे, मसपोनि/प्रियदर्शनी थोरात, पोउपनि/मधुकर सोमोसे, पोउपनी/वाय.आर. भामरे, पोहेकॉ/नारायण माळचे, पोहेकॉ/आर.यु.मोरे, पोहेकॉ/प्रदीपकुमार आखाडे, पोकॉ/सुनिल अहिरे, पोकॉ/सुजीत देवरे, पोकॉ/ राकेश बोरसे, पोकॉ/कृष्णा भिल, पोकॉ/राकेश महाले, पोकॉ/परमेश्वर चव्हाण, पोकॉ/कृष्णा भिल, पोकॉ/श्रीराम पदमर, चापोकॉ/मोहन माळी, चापोहेकॉ/मनोज देवरे यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post