धडगांव येथे सुशिलकुमार पावरा यांचा जल्लोषात स्वागत!आदिवासींचा आमदार व खासदार सुशिलकुमार पावराच- कुंवरसिंग पराडके




धडगांव प्रतिनिधी/प्रफुल्ल साने: नंदुरबार येथील जय वळवी या आदिवासी युवकाच्या खूनाच्या निषेधार्थ आदिवासी समाजाकडून काढण्यात आलेल्या मुक मोर्चा दरम्यानच्या कथित दंगल प्रकरणात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा सह एकूण १८० जणांना अटक करण्यात आली होती.मागील ३ महिने नंदूरबार कारागृहात सुशिलकुमार पावरा सह इतर कार्यकर्त्यांना ठेवण्यात आले होते.अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुशिलकुमार पावरा यांना जामीन मंजूर केल्यानंतर ३ महिन्यानंतर कारागृहातून सुटका करण्यात आली.कारागृहातून सुटका झाल्यानंतर आदिवासी शेर वापस आया,म्हणत अनेक ठिकाणी आदिवासी बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला.धडगांव तालुक्यातील बिलगांव येथील ग्रामस्थांनी व महिला भगिनींनी सुशिलकुमार पावरा यांची आरती ओवाळून शाल श्रीफळ देऊन जल्लोषात स्वागत केले. पोलिसांनी मला अटक केल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आषित कांबळे, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील व हेमंत पाटील यांनी मला जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुष पणे मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.त्यांच्याविरुद्ध मा.न्यायालय नंदूरबार येथे तक्रार नोंद होऊन न्यायालयीन चौकशी सुरू आहे. जेलमधेही आम्ही बंद्याच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही आमचे सामाजिक कार्य सुरूच ठेवले.जेलमधेच क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती साजरा करून अनेक क्रांतीकारी कार्य केले.अशा शब्दांत सुशिलकुमार पावरा यांनी आपले अनुभव सांगितले.

             सुशिलकुमार पावरा यांच्या अटकेनंतर आदिवासी समाजात असंतोष निर्माण झाला होता.जिल्ह्य़ात ४ आदिवासी आमदार व १ खासदार आहेत. कोणीही पोलीस प्रशासनाविरोधात बोलत नव्हते,कोणीही प्रतिक्रिया देत नव्हते.१८० पेक्षा अधिक बांधवांना अटक झाल्यानंतर आमच्या आमदार व खासदारांनी त्यांच्या सुटकेसाठी बोलले पाहिजे होते,परंतू आमदार व खासदार यांचीही या प्रकरणात चूप्पी दिसून आली.अनेक सामाजिक कामे ठप्प झाली होती.सुशिलकुमार पावरा हे आदिवासी समाजासाठी सातत्याने लढणारे योद्धे आहेत, बाहेर तर ते सामाजिक कार्य करतच असतात, परंतू जेलमध्ये सामाजिक कार्य करून एक क्रांती घडवून आणली.जेलमधून सुटल्यानंतर लगेचच निडरपणे सामाजिक कार्याला सुरुवात केली.म्हणून आमच्यासाठी सुशिलकुमार पावरा हेच आधुनिक बिरसा आहेत. आदिवासी समाजाचे आमदार व खासदार सुशिलकुमार पावराच आहेत,पुन्हा एकजूटीने पावरा साहेबांना पाठिंबा देऊन समाजासाठी लढूया, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते कुंवरसिंग पराडके यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post