चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी/बबन पेंदोर
शनिवार रोजी मौजे नवेगाव येथे स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवेगाव परिसरात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि सामाजिक जाणीवेतून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने जनजागृतीपर व्याख्याने, गायन कला सादरीकरण व सामूहिक भोजन असे विविध उपक्रम राबविण्यात आले. स्त्रीशक्तीचा आवाज अधिक बुलंद करण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला.
प्रमुख मार्गदर्शन करताना आकाश पाजारे यांनी जिल्हा परिषद शाळा बंद होण्यामागची कारणे स्पष्ट करत, गावकऱ्यांनी आपली शाळा कशी जिवंत ठेवावी याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले व ग्रामस्थांना शैक्षणिक चळवळीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन सिद्धार्थ कातकर यांनी प्रभावीपणे केले.
या कार्यक्रमाचे आयोजन बबन पेंदोर, वनमाला देठे कातकर (सरपंच, ग्रामपंचायत वरोडा), सुनीता करमणकर, छबिता मुन, इंदूबाई धोटे, राणी वेलेकर, शारदा कातकर, गौतमा मेश्राम, वर्षा मेश्राम, मोनाली दुबे, सम्राट मेश्राम व अर्चित निरंजने यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
कार्यक्रमाला समस्त नवेगाववाशी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.
