अली अलाना कॉलेज ऑफ फार्मसी, अक्कलकुवा येथे युवा दिन उत्साहात साजरा...





 अक्कलकुवा प्रतिनिधी/शेख इलियास 

अली अलाना कॉलेज ऑफ फार्मसी, अक्कलकुवा येथे दि. १२ जानेवारी रोजी युवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग तसेच करिअर कट्टा समन्वयक उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान करिअर कट्टा अंतर्गत सहभागी विद्यार्थ्यांनी तसेच समन्वयकांनी आपले अनुभव व अभिप्राय (फीडबॅक) विद्यार्थ्यांसमोर व प्राध्यापकांपुढे मांडले. करिअर कट्टा व करिअर संसद उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, करिअर नियोजन व व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले मा. प्राचार्य डॉ. गुलाम जावेद सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना करिअरकेंद्रित दृष्टीकोन, स्पर्धात्मक युगातील कौशल्यविकास, सातत्यपूर्ण अभ्यास व स्वविकासाचे महत्त्व विशद केले. युवकांनी केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता संशोधन, नवोन्मेष, उद्योजकता व सामाजिक जबाबदारी यांचा समतोल साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचा समारोप प्रेरणादायी संदेशाने झाला. युवा दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, भविष्यात करिअरविषयक उपक्रमांमध्ये अधिक सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा मिळाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post