साक्री प्रतिनिधी/अकिल शहा :दिनांक १३/०१/२०२६ रोजी मा. प्रभारी अधिकारी श्री. मयुर भामरे सो. सहाय्यक पोलीस निरीक्षक, निजामपुर पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळली की, निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीत निजामपुर/जैताणे गावात शासनाने प्रतीबंधीत केलेला गुटखा, तंबाखु असे साठवणुक करुन विक्री करत आहेत सदर ठिकाणी छापा मारुन कारवाई करणेबाबत निजामपुर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक, श्री. मयूर एस. भामरे, सपोनि/प्रियदर्शनी थोरात, पोउपनि/वाय. आर. भामरे, पोहेका/नारायण माळचे, पोहेकों/रतन मोरे, पोकों/दिपक महाले, पोकों/पृथ्वीराज शिंदे, पोकों/सागर चाटशिंगारे, पोकों/कृष्णा भिल, पोकों/गौतम अहिरे, असे सदर पथकाने निजामपुर गावातील इसम नामे प्रशांत जगन्नाथ बदामे रा.निजामपुर ता. साक्री यांने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधीत सुपारी व सुंगधीत तंबाखू याची आपले सावरकर रोड येथिल स्वताचे दुकानात साठा करुन तो विक्री करत असताना मिळून आल्याने, सदर ठिकाणी छापा मारुन आरोपी नामे प्रशांत जगन्नाव बदामे रा. निजामपुर ता. साक्री यास ताब्यात घेऊन सदर ठिकाणाहुन खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याचेविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123,223,274,275 सह अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम 26 (2) (iv),27(3) (d)(e),30(2)(a), 3(1)(zz),(zz) (v) चे उल्लघंन 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अटकेत आहे. सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल खालीलप्रमाणे :-
23.958/- रु. किं. पांढरे रंगाच्या प्लॉस्टिकच्या गोणीत एकून 121 नग विमल पान मसाला, कि प्रति नग 198 प्रमाणे छापील कि. प्रमाणे
30,550/- रु. किं, पांढरे रंगाच्या प्लॉस्टिकच्या गोणीत एकुन 65 नग विमल पान मसाला, कि, प्रति नग 470 प्रमाणे छापील किं.प्रमाणे
30,000/-रु. कि, पांढरे रंगाच्या प्लॉस्टिकच्या गोणीत एकून 250 नग बिमल पान मसाला, कि. प्रति नग 120 प्रमाणे छापील कि.प्र.
3,300/- रु.किं. पांढरे रंगाच्या प्नॉस्टिकच्या गोणीत एकून 100 नग V1 तंबाखु किम्मत प्रति नग 33 रुपये प्रमाणे छापील किम्मत प्रमाणे
2,400/- रु.कि, पांढरे रंगाच्या प्लॉस्टिकच्या गोणीत एकुन 80 नग V1 Big तंबाखु कि. प्रति नग 30 रुपये प्रमाणे छापील किम्मत प्रमाणे
9.960/- रु.किं. पांढरे रंगाच्या प्लॉस्टिकच्या गोणीत एकुन 332 नग VI तंबाखु किम्मत प्रति नग 30 रुपये प्रमाणे छापील किम्मत प्रमाणे
26.112/- रु. किं. पांढरे रंगाच्या प्लॉस्टिकच्या गोणीत एकुन 136 नग राजनिवास पान मसाला, कि. प्रति नग 192 प्रमाणे छापील कि.प्र.
9 6,000/- रु.कि. पांढरे रंगाच्या प्लॉस्टिकच्या गोणीत एकून 125 नग जाफरानी जर्दा ZN01 तंबाखू, किं. प्रति नग 48 रुपये प्र. छापील किम्मत प्रमाणे
एकुण किंमत- 1,32,280/- रुपये. चा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. मयुर एस. भामरे यांनी निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व दुकानदार तसेच माळमाथा परीसरातील बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, आपआपल्या गावात किवा परीसरात कोणत्याही प्रकारचे शासनाने प्रतीचंधीत केलेला गुटखा, तंबाखु असे साठवणूक करुन विक्री करण्याचे संबंधाने आपण कोणतीही मुकसंमती अथवा कोणतेही सहकार्य करु नये अन्यथा आल्याला कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल.
सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे, गा. अजय देवरे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा. एस.आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी श्री. मयूर एस. भामरे, सपोनि/प्रियदर्शनी थोरात, पोउपनि/वाय. आर. भामरे, पोहेकों/नारायण माळचे, पोहेका/रतन मोरे, पोहकों/प्रदीपकुमार आखाडे, पोहेकों/प्रशांत ठाकुर, पोकों/दिपक महाले, पोकों/पृथ्वीराज शिंदे, पोकों/सागर धाटशिंगारे, पोकों/कृष्णा भिल, पोकों/गौतम अहिरे, पोकों/श्रीराम पदमर, पोकों/टिलु पावरा, पोकों/सागर कांगणे, पोकों/प्रवीण पवार, पोकों/सुजीत देवरे, चापोहेका/मोहन माळी यांचे पथकाने केली आहे.
