अक्कलकुवा शहर प्रतिनिधी/ इलियास शेख:
अक्कलकुवा–अक्राणी विधानसभा मतदारसंघातील अक्कलकुवा ग्रामपंचायत हद्दीतील मिठ्याफळी व मक्राणीफळी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. 27) सकाळी आमदार आमश्या दादा पाडवी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी समाजकल्याण सभापती शंकरदादा पाडवी प्रमुख उपस्थित होते.
मिठ्याफळी येथे मस्जिदच्या मागे पाईप मोरीचे बांधकाम, मक्राणीफळी येथे मस्जिदपासून हॉटेल फ्रेंडपर्यंत गटारीचे बांधकाम, करीम लाला यांच्या घरापासून युसुफ मुर्गीवाले यांच्या घरापर्यंत गटार बांधकाम, अक्कलकुवा जवाई नगर येथे पाच गटारींचे बांधकाम तसेच मक्राणीफळी येथे दिनेश रामजी यांच्या घराजवळ पाईप मोरीचे बांधकाम या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
या कामांमुळे पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या दूर होऊन स्वच्छता व नागरिकांच्या आरोग्यास हातभार लागणार आहे.
कार्यक्रमास अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच उषाताई बोरा, उपसरपंच इम्रान मक्राणी, प्रा. डॉ. दिनेश खरात, रावेंद्र चंदेल, गुलाम कादर बलोच, रोहित चौधरी, प्रकाश खिची, बापु महिरे, जगदीश पवार, अमरसिंग वळवी, दिलीप पाडवी, विनित पाडवी, भावेश पाडवी, हरिश्चंद्र तडवी, संगीता पाडवी, मथुराताई पाडवी, निता माळी, इम्रान पठाण, धिजू पाडवी, कुलदीप टाक, रविंद्र पाडवी, शाकीब पठाण, बाबा कुरेशी यांच्यासह आमदारांचे स्वीय सहाय्यक रविंद्र गुरव, सुधीरकुमार ब्राम्हणे, भिकमचंद चव्हाण, हुजेफा बलोच, अविनाश बि-हाडे, आसिफ मक्राणी, करीम लाला मक्राणी, हाजी मेहमूद, शोएब कादर, जावीद सरदार बलोच, अब्दुल्ला मक्राणी आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)
.jpg)