खेळ, दर्शन व भोजनाचा आनंद; शेवाळीतील अंगणवाडी विद्यार्थ्यांची सहल यशस्वी...

 



साक्री प्रतिनिधी/अकिल शहा:दि. २२ डिसेंबर २०२५ (सोमवार) रोजी शेवाळी (दा.), ता. साक्री, जि. धुळे येथील अंगणवाडी क्र. १ व अंगणवाडी क्र. ३ यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. हिवाळी शैक्षणिक सहल शेवाळी गावापासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या शांतीवन अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडली.



या सहलीत अंगणवाडी क्र. १ व ३ मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम विद्यालयाच्या प्रांगणातील गणपती मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर शांतीवन अध्यापक विद्यालयाच्या विस्तीर्ण व निसर्गरम्य प्रांगणात विविध मैदानी खेळांचा मनमुराद आनंद लुटला. सहलीच्या शेवटी विद्यार्थ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला, अशी माहिती सेविका भारती साळुंके यांनी दिली.

एकूणच ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, शैक्षणिक व प्रेरणादायी ठरली, अशी भावना सेविका माधुरी साळुंके, योगिता वाघ, तसेच मदतनीस भारती साळुंके व सुवर्णा साळुंके यांनी व्यक्त केली.

सहलीचे यशस्वी आयोजन व अंमलबजावणीसाठी अंगणवाडी क्र. १ व ३ च्या सेविका व मदतनीसांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post