संशोधन, नवकल्पना आणि आधुनिक दृष्टिकोन; शहाद्यात एक दिवसीय राष्ट्रीय परिषद...

 



शहादा प्रतिनिधी/अहमद शेख :शहादा येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तसेच महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष (IQAC) व भौतिकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान (PM-उषा), शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या अंतर्गत

“Recent Interdisciplinary Approaches in Science, Humanities, Agriculture, Engineering, Law and Management”

या विषयावर एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन बुधवार, दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय परिषदेत नॅनोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील शास्त्रज्ञ व माजी प्राचार्य प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील प्रो. डॉ. एल. ए. पाटील, प्रो. डॉ. व्ही. ए. सोमाणी, तसेच व्ही.एन.एस.जी. विद्यापीठातील प्रो. डॉ. परवेज अहमद अब्बासी यांच्यासह आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक तज्ञ संशोधक बौद्धिक उद्बोधनपर व्याख्याने देणार आहेत.

या परिषदेत पोस्टर प्रेझेंटेशन, ओरल प्रेझेंटेशन तसेच स्कोपस सोर्स व वेब ऑफ सायन्स जर्नलमध्ये संशोधनपर लेख प्रकाशित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या राष्ट्रीय परिषदेचे प्रमुख आयोजक कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुल, शहादा असून प्रशासकीय प्रमुख प्रा. डॉ. हिमांशू जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. राठोड आहेत. परिषदेचे संयोजक म्हणून भौतिकशास्त्र विभागप्रमुख व IQAC समन्वयक प्रा. डॉ. बी. वाय. बागुल, तर डॉ. डी. वाय. पाटील सचिव म्हणून कार्य पाहणार आहेत.

या परिषदेसाठी प्रमुख अतिथी म्हणून सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. संजयजी जाधव, सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ. वर्षाताई साहेब जाधव तसेच समन्वयक श्री. संजय राजपूत उपस्थित राहणार आहेत.

या राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेत प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील अभ्यासक व संशोधकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन परिषदेच्या कार्यकारिणीने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post