नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल वळवी:नंदुरबार येथील पंच मंडळ पीर महंमद नाथानी वाचनालयात शहीद टिपू सुलतान फाऊंडेशनतर्फे स्वतंत्र सेनानी महायोद्धा फतेअली उर्फ शहीद टिपू सुलतान यांची २७५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहीद टिपु सुलतान फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून धर्मगुरु हाफीज आबीद बागवान, प्रा.फारुख खाटीक, सामाजिक कार्यकर्ते बाबु ठेकेदार, रहेमान मोमीन, सत्यनारायण शर्मा, हिरालाल चौधरी, रामकृष्ण मोरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शहीद टिपू सुलतान यांच्या तैलचित्राला अभिवादनाने झाली. यावेळी मदरशात सर्व विद्यार्थ्यांनी कुराण पठण करुन जाणता राजा शहीद टिपु सुलतान यांच्यावर फातेहा खॉनी करुन दुआ करण्यात आली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच पंच मंडळ पीर महंमद नाथानी वाचनालयाला शहीद टिपू सुलतान यांची माहिती पुस्तिका देण्यात आली. यावेळी धर्मगुरु हाफीज आबीद बागवान म्हणाले की, फतेअली उर्फ शहीद टिपू सुलतान यांनी १५६ मंदिरांना जमीन व सोनाचांदी दान दिले होते. १० हजार सोन्याची नाणी मंदिराला दान दिले होते. टिपु सुलतान यांच्या मार्गावर सर्वांनी चालले पाहीजे. सर्व महापुरुषांची आठवण सर्वांनी ठेवावी. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रंथपाल फिरोज काजी यांनी केले. तर आभार सद्दाम मोमीन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लाला बागवान, असलम कुरेशी, सलीम बागवान, आरीफ मोमीन, जाकीर शाह आदींनी केले.
