दोंडाईचा/प्रतिनिधी :मुस्लिम सेवा संघ, दोंडाईचा तर्फे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार भाऊ रावल यांना एल.सी. गेट क्रमांक १०५ येथील उड्डाणपुलासंदर्भात विविध महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या —
🔹 गरीब नवाज परिसरातील बंद असलेल्या स्ट्रीट लाइट सुरू कराव्यात.
🔹 उड्डाणपुलाच्या सुरुवातीला गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्यात यावेत.
🔹 उड्डाणपुलावर जाणाऱ्या काँक्रिट रस्त्यावर नवीन स्ट्रीट लाइट बसविण्यात याव्यात.
🔹 तसेच पावसाचे पाणी उड्डाणपुलावरून गरीब नवाज कॉलनी परिसरात साचते, त्यामुळे पाणी निचरा व्यवस्थेची तातडीने सुधारणा करण्यात यावी.
या मागण्यांवर माननीय जयकुमार भाऊ रावल यांनी निवेदनातील सर्व बाबींची सकारात्मक दखल घेऊन लवकरच समाधानकारक तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या प्रसंगी मंजूम पठाण (जिल्हाध्यक्ष, मुस्लिम सेवा संघ धुळे), जितूभाऊ गिरासे, विजयभाऊ मराठे, विक्रम पाटील तसेच प्रभाग क्रमांक ३ येथील नागरिक उपस्थित होते.
