शहादा/प्रतिनिधी:सर सैय्यद अहमद खान एजुकेशन सोसायटी संचलित, सर सैय्यद ऊर्दू प्रायमरी, ऊर्दू गर्ल्स हायस्कुल अँड ज्यूनियर कॉलेज,शहादा, जि. नंदुरबार, येथे आज दिनांक २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास संस्था अध्यक्ष अल्हाज प्रो. सैय्यद लियाकत अली सर उपस्थित होते..
विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या विचारांवर भाषण व कविता सादर केली. शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेचा संदेशही देण्यात आला.या प्रसंगी प्राचार्य सैय्यद इफ्तेखार अली सर यांनी विद्यार्थ्यांना गांधीजींच्या आदर्शांचा अवलंब करून प्रामाणिक व साधेपणाने जीवन जगण्याचे आवाहन केले.
