धुळे प्रतिनिधी/प्रकाश नाईक :सविस्तर वृत्त असे की,कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ,जळगाव व समता शिक्षण संस्था पुणे, संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे धुळे. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित One Day Workshops on Awareness & Guidance of Competitive Examinations (Under PMUSHA Soft Component) अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन दिनांक २६/०९/२०२५ शुक्रवार रोजी सकाळी ९.३० वाजता करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनपर भाषणात डॉ. अजय सुरवाडे संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा कोचिंग सेंटर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र जळगाव यांनी वरील मत व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विष्णू गुंजाळ हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते, तर कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे सिनेट सदस्य मा. नितीन ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. उदघाटक मा. डॉ. अजय उत्तमराव सुरवाडे तसेच प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि मा. नितीन ठाकूर अधिसभा सदस्य, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांचेही स्वागत प्राचार्य डॉक्टर विष्णु गुंजाळ व कार्यशाळेचे समन्वयक प्रा.डॉ.सुदाम राठोड यांनी केले. तसेच बी.एस.डब्ल्यू भाग एक या वर्गातील विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत गीत म्हणून स्वागत केले.
एकदिवशीय स्पर्धा परीक्षा जाणीव जागृती व मार्गदर्शन कार्यशाळेचे प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी केले.
कार्यशाळेचे उदघाटक मा. डॉ. अजय उत्तमराव सुरवाडे संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा कोचिंग सेंटर, कबचौउमवि,जळगाव, यांनी सर्वपथम मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि मी या कार्यशाळेचे उद्घन झाले असे जाहीर करतो. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विषयी जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात होऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचे अभ्यास सुरु केला पाहिजे .बारटी, महाज्योती सारथी स्पर्धा परीक्षा मार्दर्शन करणाऱ्या व प्रशिक्षण देणाऱ्या या शासकीय संस्था आहेत.यांच्या जाहिराती आल्या की विद्यार्थ्यांनी फार्म भरून सहभागी झाले पाहिजे .आपली निवड झाल्यावर प्रशिक्षणा सोबत स्टायपेड सुद्धा मिळते. त्यानंतर या कार्यशाळेचे मा. नितीन ठाकूर अधिसभा सदस्य, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले आज दिवसेन दिवस स्पर्धा वाढत आहेत.त्याकरिता विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेशा घेतला की,त्याबरोबरच स्पर्धा परीक्षा चा अभ्यासक्रम पाहून अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.उदघाटन सत्राचे सूत्र संचालन प्रा.डॉ. प्रीती वहाणे यांनी केले. तसेच उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्वांचे आभारही प्रा.डॉ.प्रीती वहाने यांनी मानले.
प्रथम सत्रामध्ये प्रा. दिलीप राठोड (संचालक, लक्ष अकॅडमी, चाळीसगाव) याचे सर्प्रथम स्वागत करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतात स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी आणि अभ्यासाचे नियोजन,एम पी एस सी /यु पी एस सी या अभ्यासक्रमाबाबत सरळ सेवा भरती,प्रत्येक घटक व उपघटक यांचे प्रश्न या बाबत सविस्तर व सखोल मार्गदर्शन केले.
त्यानंतर डॉ.शिवाजीराव पाटील सदस्य कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांचे स्वागत प्राचार्य डॉ.विष्णू गुंजाळ यांनी केले. आपले मनोगत व्यक्त करताना मा.शिवाजी पाटील यांनी सांगितले की या शैक्षणिक वर्षात विद्यापीठमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धती.परीक्षेला जाण्या अगोदारचे नियोजन ,उत्तर पत्रीकाची पाने तपासून घेणे ,हाल तिकीट ,याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
दुस-या सत्रात प्रा. विलास चव्हाण (माजी संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव) यांचे स्वागत प्राचार्य डॉ.विष्णू गुंजाळ यांनी केले. प्रा. विलास चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी आणि वेळेचे नियोजन या संदर्भात विद्यार्थ्यांना अनेक दाखले व संदर्भ, पुस्तके व अभ्यासक्रमाचे स्वरूप ,गुणदान पद्धती याबाबत मौलिक मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षा कार्यशाळेच्या या दोन्ही सत्राचे सूत्र संचालन व आभार महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राजेंद्र बैसाणे यांनी मानले.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
दुपारच्या तृतीय सत्रात प्रा. विकास गिराशे (युनिक अकॅडमी, धुळे)यांचे स्वागत प्रा.डॉ.गोपाल निंबाळकर यांनी केले. तसेच स्पर्धा परीक्षा स्वरूप आणि प्रकार या विषयावर मार्गदर्शन सोप्या पद्धतीने तसेच सादरीकरणाच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर चौथ्या सत्रात प्रा.राहुल वाघ गुलाब यांचे पुष्प व बुके देवून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विष्णू गुंजाळ सर यांनी स्वागत केले. या प्रसंगी स्पर्धा परीक्षा तार्किक विचार आणि विश्लेषणात्मक क्षमता या विषयावर प्रा.राहुल वाघ यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असे मार्गदर्शन केले.
समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विष्णू गुंजाळ उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ योगेश पाटील ( उप प्राचार्य विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे) उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळे मध्ये आलेल्या विविध अनुभवाचे समाधानकारक मनोगत परिसरातील आलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. ज्यामध्ये मनोगत व्यक्त करणारे विद्यार्थी-
१.सुमीत बारी- जयहिंद महाविद्यालय, धुळे
२.प्रीती निकम- बियानी विधी महाविद्यालय, धुळे
३.मंगेश सिंपी -कुसूंबा महाविद्यालय, धुळे
४.निकम भोये -समाज कार्य महाविद्यालय ,अमळनेर
५.मोहीनी चव्हाण- डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे यांनी हिरीरीने सहभाग घेतला.
समारंभ क्षेत्रात सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ सर यांनी बुके देवून स्वागत केले. प्रा डॉ. योगेश पाटील यांनी समारोपीय सत्रात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत थोडक्यात मार्गदर्शन केले.
स्पर्धा परीक्षा जाणीव जागृती व मार्गदर्शन कार्यशाळेचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना समारोपीय सत्रात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन, दिवसा स्वप्न बघितले पाहिजेत. आय पी एस, पीएसआय , विक्रीकर निरीक्षक समाज विकास अधिकारी,महिला व बालकल्याण अधिकारी ,समाजकल्याण अधिकारी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षांना अर्ज करून स्पर्धा परीक्षेस बसले पाहिजे.आपल्या,महाविद्यालयातील माजी विद्यार्थी या पदावर काम करीत आहेत . त्याप्रमाणे समाजकार्य विद्यार्थ्यांसाठी अनेक क्षेत्रात सेवेच्या संधी उपलब्ध आहेत.आज पासूनच आपण स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु करून यश मिळेपर्यंत सातत्य ठेवले पाहिजे. असे आपल्या मोलाच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना आवाहन केले.
सदर कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विष्णू गुंजाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली आहे. याकार्यशाळेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ,जळगाव कार्य क्षेत्रातील विविध महाविद्यालयातील एकूण ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
सदर कार्यशाळेसाठी संयोजन समितीचे प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य. डॉ. विष्णु गुंजाळ, कार्यशाळा समन्वयक प्रा. डॉ. सुदाम राठोड, सदस्य प्रा. डॉ. राजेंद्र बैसाणे, प्रा. डॉ. फरीदा खान प्रा. गजेंद्र जगदेव यांनी परिश्रम घेतले. तसेच सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

