नंदुरबार /प्रतिनिधी: महाराष्ट्रभर सुरू असलेल्या सत्यशोधक शेतकरी सभेचे उलगूलान मोर्चा आता नंदुरबार तालुक्यात देखील होणार ,मुख्य मागण्या 12 व इतर 20 मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा येत्या 13 ऑक्टोंबर 2025 वार सोमवारी सत्यशोधक ऊलगुलान मोर्चा निश्चित..!
सविस्तर वृत्त असे की,वनहक्क दाबेदारांची पिकपेरा नोंद २०२५-२६ करुन तहसिल कार्यालयात जमा करण्यात यावी.आदिवासी वनहक्क दावेदारांची पिक पाहणी ही ई पिक पाहणी ऍपमध्ये होत नसल्यामुळे सदर ऍप दुरुस्ती करण्यात यावे जोपर्यंत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत ऑफलाईन रजिस्टरवर पिक नोंद करण्यासाठी तलाठ्यांना आदेशित करावे या अगोदर २०१० ते २०१८, २०१९, २०२० मध्ये तसे रजिस्टर ठेवण्यात आले होते. परंतु गेल ०३ वर्षांपासून पिक नोंदणी बंद केली आहे ती पुन्हा सुरुवात करण्यात यावी.नंदुरबार जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी द्या.आदिवासी वनहक्क कायद्यांतर्गत कलम (प्र ४,६ (४)) यानुसार वनहक्क दावेदारांना कोरोना काळात काढलेल्या अंतिम आदेश नोटिसा थांबवुन त्या दावेदारांची स्थळपाहणी करावे.सत्यशोधक शेतकरी सभेच्या नंदुरबार ते मुंबई पायी बिढार महामोर्चाला मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी अंमलात आणावे. आदिवासींच्या आरक्षणात धनगरसह इतर कोणत्याही जातीला समाविष्ट करु नये.मा. महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदिवासींच्या जमिनी भाडेपट्ट्यावर भांडवलदारांना जमीन विकण्याचा आदेश काढला आहे तो त्वरित रद्द करावे. नंदुरबार येथील जय वळवी या आदिवासी युवकाचा खून करणाऱ्यांवर कडक कारवाई करा.नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क दावा दाखल केलेल्या दावेदारांचे जिल्हास्तरीय समिती व उपविभागीयस्तरीय समितीने नव्याने जागेवर जाऊन पुर्नपडताळणीसाठी तलाठी कार्यालयात पाठविण्यात आलेल्या दाव्यावर नमुना प्रपत्र १२ अ पुर्नपडताळणीसाठी वनविभागाचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर हजर राहत नाही. विनाकारण त्या फार्मवर सही देण्यास टाळाटाळ करीत आहे. तसेच वनहक्क दावेदारांनी दावा दाखल करतेवेळी वनविभागाने दिलेला कंपार्टमेंट नंबरनुसार मालकी हक्क प्रमाणपत्र मिळालेले आहे. परंतु ज्यावेळी शासकीय योजना, जमीन सुधारणा इ. विकासकामासाठी योजना राबवितेवेळी प्रमाणपत्र चूकीचे कंपार्टमेंट, क्षेत्र चूकीचे असल्याचे सांगण्यात येते. अशा वनकर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच विकास कामात अडथळा निर्माण करणाऱ्या व चुकीचे अभिप्राय नोंदविणाऱ्या वनकर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल
करा.पिढ्यानपिढ्या वनजमिनी खेडणाऱ्या आदिवासी व इतर जंगलनिवासी यांना ज्यांनी (सत्यप्रतिज्ञापत्र, ज्येष्ठ नागरिक जबाब, बांधबंदिस्ती इ. भौतिक पुरावे) दोनपेक्षा अधिक पुरावे दाखल केले आहेत व ग्रामसभेत पात्र ठरले आहेत. अशा जंगलखेडूंना कसलेल्या जमिनीचा ७/१२ उतारा ताबडतोब देण्यात यावा.अशा जवळपास मुख्य मागण्या 12 व इतर मागण्या 20 या मागण्या घेऊन सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा येत्या 13 ऑक्टोंबर 2025 वार सोमवारी सत्यशोधक ऊलगुलान मोर्चा निघणार आहे. तसे पत्र नायब तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी कॉ. करणसिंग कोकणी कॉ. विक्रम गावित,कॉ. मनोहर वळवी,कॉ. रविदास वळवी,कॉ. राजू वळवी व अन्य वनहक्क दावेदार उपस्थित होते.
