अली अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी, अक्कलकुवा येथे “फार्मास्युटिकल इंडस्ट्रीतील आधुनिक उपकरणांवर” चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन..


 अक्कलकुवा प्रतिनिधी/ इलियास शेख:अली अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी, अक्कलकुवा येथील फार्मास्युटिकल केमिस्ट्री विभागातर्फे “फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक उपकरणांवर” चार दिवसीय हँड्स-ऑन ट्रेनिंग कार्यशाळेचे आयोजन जामिया इस्लामिया इशाअतुल उलूम कॅम्पस येथे करण्यात आले.

ही कार्यशाळा प्राचार्य डॉ. गुलाम जावेद खान यांच्या मार्गदर्शनाखाली इंडस्ट्री–अकॅडेमिया सहयोग उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आली होती. यामागील उद्देश विद्यार्थ्यांना आधुनिक उपकरणांचे संचालन, देखभाल आणि विश्लेषण प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे हा होता.



या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. एजाज अहमद (प्रोफेसर व विभागप्रमुख, फार्मास्युटिकल केमिस्ट्री) आणि अ. प्रा. सिद्दीक पटेल होते. एकूण ८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ८० विद्यार्थ्यांनी कार्यशाळा यशस्वीरित्या पूर्ण केली.

आर.एस.आय.सी.टी. ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे संचालक श्री. अनिल सी. विसपुते यांनी विद्यार्थ्यांना यूव्ही–व्हिजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर, एफटीआयआर, फ्लेम फोटोमीटर, एचपीएलसी यांसारख्या उपकरणांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. विद्यार्थ्यांनी या उपकरणांवर प्रत्यक्ष प्रयोग करून गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस (GLP) आणि गुणवत्ता नियंत्रणातील महत्त्व समजून घेतले.

जामिया इस्लामिया इशाअतुल उलूम संस्थेचे अध्यक्ष मौलाना हुजैफा वस्तानवी साहेब यांनी या कार्यशाळेचे कौतुक करताना सांगितले की, अशा कौशल्यवृद्धी उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव मिळतो आणि रोजगाराच्या संधी वाढतात.

प्राचार्य डॉ. गुलाम जावेद खान यांनी सांगितले की ही कार्यशाळा शैक्षणिक ज्ञान आणि औद्योगिक व्यवहारातील अंतर कमी करणारी प्रभावी पायरी ठरली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post