भारत मूलनिवासी भिल्ल वळवी परिवार 10 वा स्नेहसंमेलन स्थळ पाहणी...!


धडगाव/प्रतिनिधी 

सविस्तर वृत्त असे की,धडगांव दिनांक 5/10/2025 भारत मूलनिवासी भिल्ल परिवार तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या 10 वा स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या आयोजनाच्या अनुषंगाने कार्यक्रमाच्या स्थळाची पाहणी 5/10/2025 रोजी करण्यात आली. 

या पाहणीस भारत मूलनिवासी भिल्ल वलवी परिवाराचे प्रमुख मान्यवर पदाधिकारी तसेच आयोजन समिती सदस्य उपस्थित होते.. पाहणी दरम्यान कार्यक्रम स्थळावरील विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. मंचव्यवस्था.आसन व्यवस्था.भोजन सुविधा. निवास व्यवस्था.सुरक्षा नियोजन.कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी समितीने आवश्यक सूचना केल्या.

10वा स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून समाजातील एकता. बंधुता.व सांस्कृतिक परंपरेचा गौरव पुन्हा अधोरेखित करण्याचा हेतू आहे. कार्यक्रमात गुजरात. मध्य प्रदेश. महाराष्ट्र. मधील वलवी परिवार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post