वसंतराव नाईक महाविद्यालयात नॅकच्या नवीन नियम संदर्भात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न...


शहादा/प्रतिनिधी:
शहादा येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष व भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने नॅकच्या नवीन नियमा संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय प्रमुख मा. प्रा. डॉ. हिमांशुभाऊ जाधव या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी, मा. प्राचार्य डॉ. डी. डी. राठोड, कार्यालयीन अधीक्षक मा. श्री. विजयभाई जाधव प्रमुख अतिथी तर अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्षाचे समन्वयक व भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. बी. वाय. बागुल प्रमुख वक्ता म्हणून यावेळी मंचावर उपस्थित होते. प्रा. डॉ. बी. वाय. बागुल यांनी नॅकच्या नवीन नियमांची पीपीटी सादरीकरणाच्या माध्यमाने सखोल माहिती दिली.

आपले महाविद्यालय नॅकच्या चौथ्या सायकलला सामोरे जात असतांना नवीन काय करता येईल या संदर्भात त्यांनी धावता आलेख मांडला. नॅक मूल्यांकन आता आभासी पद्धतीने होणार आहे. श्रेणी पद्धत बंद करण्यात आली आहे. हा निर्णय फक्त गुणवत्तेवरच आधारित असल्याने या पद्धतीने आपल्याला कार्य करावे लागेल, असे सांगत त्यांनी नॅकच्या नवीन प्रणालीच्या 10 निकषांची सूक्ष्म माहिती दिली.

          महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. डी. डी. राठोड यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले की आपण करत असलेल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्याची नोंद ठेवा. कुठलीही गोष्ट करतांना त्याचा योग्य तो पुरावा आपल्याजवळ तयार हवा. कागदपत्रांची व्यवस्थित जुळवणूक करून कार्याला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी या कार्यशाळेचे अध्यक्ष व आमचे प्रशासकीय प्रमुख मा. प्रा. डॉ. हिमांशुभाऊ जाधव यांनी प्रत्येकजण कार्य करत असल्याचे नमूद करत सांगितले की, नॅकच्या नवीन नियमांची माहिती करून घेत आपल्याला पुढे जायला हवे. टप्प्याटप्प्याने काम करत नॅकच्या नवीन नियमांना सामोरे जात आपण त्यांच्या कसोटीवर खरे उतरण्याच्या प्रयत्न करू. यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची आपल्याला मदत घेता येईल. नॅक संदर्भात कार्य करत असतांना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवही वाढीस लागली पाहिजे. आपण सर्वांनी नॅकच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती करून घेत व्यावसायिक बाणा जोपासला पाहिजे. सोबतच व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करत त्यांनी नवीन कार्याला सामोरे जाण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. एन. एम. साळुंखे यांनी तर आभार प्रकटन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. राम हजारी यांनी केले. या कार्यशाळेला सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर बंधु उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post