धुळे प्रतिनिधी/ प्रकाश नाईक :“श्रद्धेची ज्योत पेटवा मनामध्ये,भोलेनाथ देतील साथ प्रत्येक क्षणामध्ये.”हिंदू धर्मात काळाला विशेष महत्व दिले गेले आहे. प्रत्येक वेळी देवपूजेला ठरावीक महत्त्व असते. प्रदोषकाल हा त्यापैकीच एक पवित्र काळ आहे. सूर्यास्तानंतर साधारण दीड तासाचा कालावधी ‘प्रदोषकाल’ म्हणून ओळखला जातो. या काळात केलेली शिवपूजा सर्वाधिक फलदायी मानली जाते. म्हणूनच त्रयोदशीच्या दिवशी, म्हणजे महिन्यातील दोन्ही पंधरवड्यांमध्ये येणाऱ्या त्रयोदशीला, प्रदोषकाळी उपवास करून शिवाची पूजा केली जाते. या उपवासालाच प्रदोष व्रत म्हणतात.
पुराणकथेनुसार, समुद्र मंथनाच्या वेळी सर्व विष प्रकट झाले आणि त्या विषामुळे सृष्टीचा नाश होणार होता. तेव्हा भगवान शंकराने ते हलाहल विष प्राशन केले. त्या क्षणी संपूर्ण जगाने त्यांची प्रार्थना केली आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रदोषकालीन पूजा केली. शिवाने आनंदाने त्या प्रार्थना स्वीकारल्या. त्या दिवसापासून प्रदोषकाळ हा शिवभक्तीचा सर्वोच्च काळ मानला गेला. त्यामुळे प्रदोष व्रत हा फक्त उपवास नसून, भक्तीचा आणि कृतज्ञतेचा संकल्प आहे.
या व्रताचे पालन करणारा भक्त सकाळपासून उपवास सुरू करतो. दिवसभर पवित्रतेचे पालन करून तो शिवस्मरणात रमतो. काही लोक फळाहार घेतात तर काही संपूर्ण उपवास करतात. प्रदोषकाळ आल्यानंतर शिवलिंगाचे पंचामृत अभिषेक केले जातात. जल, दूध, मध, दही, तूप आणि गंगाजल यांनी स्नान घालून शिवलिंगास बेलपत्र, आकडे, धतूरा, फुले अर्पण केली जातात. यावेळी “ॐ नमः शिवाय” या पंचाक्षरी मंत्राचा जप सर्वाधिक केला जातो. मंत्रोच्चाराने वातावरण पवित्र बनते आणि भक्तीभाव अधिक दृढ होतो.
शिवपूजेच्या वेळी रुद्राष्टक, लिंगाष्टक, शिवतांडव स्तोत्र यांचे पठण केले जाते. प्रदोष स्तोत्राचा उल्लेखही पुराणांत आहे. हा स्तोत्रपठण भक्ताच्या जीवनातील पापांचा नाश करून पुण्यसंचय वाढवतो असे मानले जाते. पूजा झाल्यानंतर दीप प्रज्वलित करून शिवाची आरती केली जाते आणि नंतर दान करून प्रसाद वाटला जातो. या व्रताचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे दानधर्म. कारण दानाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते.
प्रदोष व्रताचे महत्व फार व्यापक आहे. या व्रताचे पालन केल्याने घरातील कलह नाहीसे होतात, आरोग्य चांगले राहते, आयुष्य वाढते आणि विशेष म्हणजे मनशांती मिळते. नोकरीतील अडथळे, आर्थिक संकटे, वैवाहिक समस्या अशा अनेक अडचणी दूर होतात असे अनुभव भक्त सांगतात. काहींच्या मते या व्रतामुळे पापक्षालन होऊन अखेरीस मोक्षप्राप्तीही होते.
विशेष म्हणजे प्रदोष व्रत सोमवार किंवा शनिवारच्या दिवशी आले तर त्याला अधिक महत्व प्राप्त होते. सोमवारी आलेला प्रदोष सोमप्रदोष म्हणून ओळखला जातो आणि तो शिवशक्ती व सौभाग्य वाढवणारा मानला जातो. शनिवारी आलेला प्रदोष शनीप्रदोष म्हणून प्रसिद्ध आहे. या व्रतामुळे शनीदोषाचा प्रभाव कमी होतो आणि जीवनातील संकटांपासून सुटका मिळते असे मानले जाते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रदोष व्रत हा मनाला शांत करणारा आणि श्रद्धा जागवणारा मार्ग आहे. या व्रताद्वारे भक्त केवळ शिवकृपा मिळवतो असे नाही, तर स्वतःमध्ये संयम, भक्त
नाव :- हितेश नरेंद्र माळी.
वर्ग :- FY.BSW
महाविद्यालयाचे नाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे (नकाने) धुळे
