धाराशिव जिल्हा प्रतिनिधी/बिलाल कुरेशी:दिनांक २७ जुलै २०२५ रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने लहुजी ग्रुप, लहुजी नगर, शिराढोण यांच्या मार्फत जिल्हा परिषद प्रशाला शिराढोण शाळेमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सुरुवातीला निबंध स्पर्धा घेण्यात आली त्यानंतर लगेच वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये शिराढोण गावातील इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे ७० विद्यार्थी अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते.या स्पर्धेसाठी लहान गट व मोठा गट असे दोन गट करण्यात आले होते. प्रत्येक गटातून दोन्ही स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले. त्यांना रोख रक्कम अनुक्रमे ११०५,७०५,५०५ आणि स्मृतिचिन्ह व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. या दोन्ही स्पर्धेचे पारदर्शक नियोजन जि. प. प्रशाला शाळेचे उपक्रमशील शिक्षक संघशील रोडे सर यांनी केले.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून चंद्रकांत महाजन सर, महेश सहाणे व किरण नाईकवाडे यांनी काम पाहिले.सदरील स्पर्धेचे बक्षीस वितरण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिवशी १ ऑगस्ट 2025 रोजी करण्यात येणार आहे. या स्पर्धा दरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना अमोल चंदेल सर,राहुल पाटील, झेलम शिंपले यांनी बिस्किटे वाटप केली.या स्पर्धेचे आयोजन लहुजी ग्रुप चे प्रमुख दीपक सहाणे , पप्पू साठे ,अमोल नरसिंगे, संजय थोरात ,गोरख कांबळे, दादा साठे लखन सहाने, महेश सहाने, बालाजी ताटे, उमाकांत साठे, गोविंद वैरागे यांनी केले.