संत कान्होपात्रा यांची पुण्यतिथी साळेगाव येथे अतिशय उत्साहात कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन..


धाराशिव जिल्हा प्रतिनिधी/बिलाल कुरेशी:आपले समाज बांधव संतोष अंधारे, महादेव अंधारे रामदास अंधारे मदन अंधारे बाबा अंधारे तसेच सर्व अंधारे परिवार राहणार साळेगाव यांच्या प्रमुख पुढाकारातून गेली पाच वर्षे झाली साळेगाव या ठिकाणी संत कान्होपात्रा यांचे जयंती तथा पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न होत असतो खरोखरच आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपल्यातील एक समाज बांधव कायमस्वरूपी आणि सातत्याने आपल्या अभिमान असणाऱ्या संत स्त्री संत कान्होपात्रा यांच्या आठवणीला उजाळा देत हा सण किंवा हा त्योहार साजरा केला जातो. 

आपल्या समाजातील भातू समाजातील सर्वच बांधवांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये संत कान्होपात्रा यांचे महात्म्य यांचे विचार जनतेसमोर आले पाहिजे आपल्या समाजासमोर पुढील पिढीची आहे यांना यांचे सर्व विचार आपल्याला अवगत करून द्यावे लागतील त्याकरिता जे काही साहित्य संत कान्होपात्रा यांचे उपलब्ध होईल त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे व पुढील पिढीसाठी हे उपलब्ध करून द्यावे प्रत्येक ठिकाणी अशी जयंती किंवा अशी पुण्यतिथी ही साजरी करत राहिली पाहिजे कारण याचा अभिमान फक्त आपल्याला आहे कारण आपल्या समाजाच्या या संतकानोपात्रा विठ्ठलाच्या चरणी समर्पित झाल्या आणि नको असलेल्या रुढीपरंपरेला त्याच ठिकाणी विराम लावण्याचे काम यांनी केलं आणि अतिशय थोर विचार यांनी जगासमोर विठ्ठलाची भक्ती करत करत मांडण्याचा प्रयत्न केला या विचाराला आपण पुढे घेऊन जाणे काळाची गरज आहे.

Post a Comment

Previous Post Next Post