सोनवल टुकी तालुका शहादा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या छतावरील पत्रे सडल्याने पावसाळ्यात वर्गांच्या खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची गळती सुरू


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे :सोनवल टुकी तालुका शहादा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या छतावरील पत्रे सडल्याने पावसाळ्यात वर्गांच्या खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची गळती सुरू राहत असल्याने शाळेतील लहान मुलांना वर्गात बसायला जागा शिल्लक राहत नाही.विद्यार्थ्यांचे कपडे ओले होतात त्यामुळे पालकांमध्ये कमालीच्या रोश व्यक्त केला जात असून जिल्हा परिषदेने शाळेच्या इमारतीची त्वरित दुरुस्ती न केल्यास शाळेला कुलूप लावण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे.

           सोनवल टूकी हे गाव छोटेसे गाव असून आपल्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे शिवाय ती चांगल्या प्रकारे मिळायला पाहिजे.शाळेच्या आवारात चांगल्या सुविधा मिळणे गरजेचे असते.शाळेतील आवारात वातावरण जेवढे प्रफुल्लित असते तेवढ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे उत्साह असतो मात्र जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या दुर्लक्षेतेमुळे गावातील लहान मुलांना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे.

          शाळेत साधारणता ५० पेक्षा अधिक विद्यार्थी असून दोन वर्ग खाेल्या आहेत.एक कार्यालयासाठी आहे.गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी शाळेच्या इमारतीवरील पत्रे नवीन लावण्यात आली होती.मात्र पत्रे निकृष्ट दर्जाचे असल्याने जीर्ण झालेले आहेत.ठिकठिकाणी त्यांना छिद्रे पडल्याने पावसाचे पाणी सरळ वर्गात पडत असते.लहान शाळकरी मुलांच्या अंगावर पडते.कपडे ओले होतात.पालकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या मात्र कोणीही अद्याप दखल घेतलेली नाही.

           शहादा पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला माहिती देण्यात यावी.संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासन विभागाला माहिती देऊन पत्रांची दुरुस्ती करावी.सोनवल गावातील व परिसरातील लोकप्रतिनिधींनी देखील दखल घेणे गरजेचे आहे अशी मागणी पालकांची आहे.

Post a Comment

Previous Post Next Post