साक्रीत आद्य मराठी पत्रकार, 'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करीत पत्रकार दिन साजरा.‌...

 


साक्री प्रतिनिधी /अकिल शहा :
6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' या नावाने पहिले मराठी वृत्तपत्र प्रकाशित करून मराठी वृत्तपत्राचा पाया रचला. त्याला यंदा 193 वर्षे पूर्ण होत आहेत. जांभेकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. 'दर्पण' हे पहिले मराठी वृत्तपत्र प्रथम पाक्षिक म्हणून सुरू झाले. 4 मे 1832 पासून मराठी, इंग्रजी अशा दोन्ही भाषांत हे वृत्तपत्र प्रकाशित केले जाई. 'दर्पण' म्हणजे आरसा. सद्यःस्थितीचे खरेखुरे दर्शन वृत्तपत्राच्या माध्यमातून घडवून झोपलेल्या समाजाला जागे करणे हाच या नावामागील बाळशास्त्रीचा हेतू होता. यामुळेच 'दर्पण'मधून मुलकी व न्याय खात्यातील अधिकाऱ्यांची माहिती तसेच वैज्ञानिक घडामोडी, स्त्राrशिक्षण, विधवा पुनर्विवाह आदी सामाजिक प्रश्नांवर जहाल लिखाण झाले. प्रामुख्याने विधवा पुनर्विवाहाची चळवळच 'दर्पण'मधील लिखाणामुळे उभी राहिली.

 'दर्पणकार' बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण मराठी वृत्तपत्राचा वर्धांपण दिनाच्या पार्श्वभूमीवर साक्री तालुका प्रेस क्लबच्या व जन ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे उपस्थित होते.

जागतिक मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक वजा संचलन साक्री तालुका प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष जगदीश शिंदे यांनी केले यावेळी त्यांनी दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतींना उजाळा देत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटल्या जाणाऱ्या पत्रकारितेने

देशात कर्तव्यदक्ष, सजग, निःपक्ष आणि निर्भय पत्रकारिता रूजवली,टिकवली आणि जनसेवेसाठी उपयोगात आणली तर, देशाची प्रगती साधणे सहज शक्य आहे. असे विचार व्यक्त केले. उपविभागीय अधिकारी श्री. बांबळे यांनी तालुक्यातील सर्व बातमीदार, पत्रकार आणि छायाचित्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी प्रेस क्लबचे मार्गदर्शक तथा ज्येष्ठ पत्रकार जी टी मोहिते, साक्री तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळकृष्ण तोरवणे, जन ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, ज्येष्ठ पत्रकार विद्यानंद पाटील, शरद चव्हाण, रवी खैरनार, ज्ञानेश्वर (नाना) ढालवाले, जितेंद्र जगदाळे, संघपाल मोरे, कल्पेश मिस्तरी, खंडेराव पवार, अकिल शहा, विलास देसले, प्रवीण पाटील, प्रवीण सूर्यवंशी आदी पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post