बुलडाणा येथे मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. सिद्धार्थ खरात यांचा जाहीर सत्कार व पदाधिकारी बैठक संपन्न..


बुलढाणा/प्रतिनिधी:शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मेहकर विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार श्री सिद्धार्थ खरात यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम व पदाधिकाऱ्यांची बैठक आज दिनांक ५/१/२०२५ रोजी शेतकरी भवन कृ ऊ बा समिती बुलडाणा येथे संपर्क प्रमुख प्रा श्री नरेंद्र खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवत, श्री वसंतराव भोजने, विधानसभा संपर्क प्रमुख श्री राजेंद्र रावराणे, सौ जयश्री ताई शेळके, महीला आघाडी जिल्हा प्रमुख सौ चंदा ताई बढे, जिल्हा संघटक प्रा श्री डी एस लहाने सर, डॉ श्री गोपाल बच्छिरे, जिल्हा समन्वयक श्री संदीप दादा शेळके , युवासेना जिल्हा प्रमुख श्री नंदु कऱ्हाडे, श्री शुभम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

 मेहकर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवनिर्वाचित आमदार श्री सिद्धार्थ खरात यांचा बुलडाणा जिल्हा शिवसेनेतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने, नव्या जोशाने कामाला लागावे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्या अनुषंगाने पक्ष संघटन मजबूत करणे, सदस्य नोंदणी करणे इत्यादी विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी रोजी होणाऱ्या जयंती निमित्त प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी करावी असे आवाहन मान्यवरांनी यावेळी उपस्थितांना केले. 

    या कार्यक्रमाला उप जिल्हा प्रमुख श्री सुनील घाटे, श्री बद्री बोडखे, आशिष रहाटे, तुकाराम काळपांडे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, विजय इंगळे, किसन धोंडगे, महेंद्र पाटील, दादाराव खार्डे, दिपक मापारी, गजानन वाघ, दिपक चांभारे, ईश्वर पांडव, श्रीराम खेलदार, शहर प्रमुख गजानन ठोसर,समदभाई कुरेशी, रमेश ताडे, भीमराव पाटील,, संजय वडतकर, दिलीप वाघ, वासुदेव बंडे पाटील, अशोक गव्हाणे, गजानन उबरहंडे, विजय इतवारे, गणेश पालकर, एकनाथ कोरडे, आशिष खरात, प्रा सिद्धेश्वर आंधळे, तसेच

शिवसेना, युवासेना सेना, महीला आघाडी, सर्व अंगीकृत संघटनांचे जिल्हा प्रमुख , उप जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख शाखा प्रमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत.

Post a Comment

Previous Post Next Post