शिराढोण प्रतिनिधी /बिलाल कुरेशी:शिवारातील शेतकऱ्यांसाठी शासनाने २०२३-२४ च्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी आर्थिक मदतीची योजना मंजूर केली असून, यासाठी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीसाठी हक्काची मदत मिळवून देण्यासाठी महत्त्वाची असून, त्यासंदर्भात ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयाने माहिती प्रसिद्ध केली आहे.
अतिवृष्टी मदतीची यादी जाहीर
शासन निर्णयानुसार १० डिसेंबर २०२४ रोजी मंजूर झालेल्या अतिवृष्टीची यादी ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय येथे डकविण्यात आली आहे. या यादीत समाविष्ट शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच, ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत समाविष्ट नाहीत, त्यांनी त्वरित ग्रामपंचायत रोड जवळील सेतू केंद्रात जाऊन आपल्या नावाची खात्री करणे आवश्यक आहे.
सेतू सुविधा केंद्रात प्रमाणीकरणाची सुविधा
यादीत असलेल्या शेतकऱ्यांनी पवार सेतू सुविधा केंद्र येथे जाऊन आधार प्रमाणीकरण करणे अत्यावश्यक आहे. या प्रमाणीकरणाशिवाय मदतीसाठीची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. केंद्रात जाऊन शेतकऱ्यांनी "केवायसी" प्रक्रिया पूर्ण करून आपली पात्रता निश्चित करावी.
फसव्या माहितीपासून सावध राहा
शेतकऱ्यांनी कोणत्याही गैरप्रकारांपासून सावध राहून फक्त अधिकृत केंद्रांशी संपर्क साधावा. शासनाकडून यासाठी अधिकृत व्यवस्था करण्यात आली असून, मदतीची प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविण्यात येत आहे.
आव्हान
शेतकऱ्यांनी वेळ वाया न घालवता आपल्या हक्काच्या मदतीसाठी आजच पवार सेतू सुविधा केंद्राला भेट द्यावी. "आपला हक्क अबाधित ठेवा आणि शासनाच्या योजनेचा लाभ घ्या.""पवार सेतू सुविधा केंद्र येथे जाऊन केवायसी करून घ्या आणि अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई मिळवा."तुमच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी आजच पाऊल उचला!
