नंदुरबार !Nandurbar/ SKpublicvoice
प्रतिनिधी/नरेश वळवी
जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत ,वेळोवेळी जिल्हा परिषदकडे पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावित यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी निवेदन सादर केले आहे. सचिव मुख्यमंत्री सचिवालय, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार, अध्यक्षा जि. प.नंदुरबार डॉ.सुप्रिया गावीत,उपाध्यक्ष जि.प.नंदुरबार
सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नंदुरबार, नंदूरबार जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गणेश पराडके, माजी राज्यमंत्री शालेय शिक्षण बच्च कडू, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, विभागीय आयुक्त ,नाशिक विभाग नाशिक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल गायकवाड जि.प. नंदुरबार, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश प्राथमिक जिल्हा परिषद, नंदुरबार विकास घुगे राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांनाही प्रहार शिक्षक संघटनेचे निवेदन सादर केले आहेत. विषय प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ मार्गी लावणेबाबत जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्यात तळोदा तालुक्यातील डी.सी. पी.एस.धारकांचा 7 वा वेतन आयोगाचा दुसरा हप्ता अदा करणे, चटोपाध्याय वेतन श्रेणीत उर्वरीत शिक्षकांचे प्रस्ताव निकाली काढणे , 7 वा वेतन आयोगाच्या फरकाचा तिसरा हप्ता तालुकास्तरावर वितरीत करणे, आपसी आंतरजिल्हा बदलीने नंदुरबार जि.प.त आलेल्या शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेबाबत, प्रलंबित मेडीकल फाईल निकाली काढणे, वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयके मंजूर झालेल्या शिक्षकांना रक्कम अदा करणे, थकीत देयके काढण्यासाठी आर्थिक तरतुद उपलब्ध करुन देणे, जी.पी.एफ. स्लिपा तात्काळ निकाली काढणे, शहादा तालु शालार्थ काम करणारे शिक्षक दिपक मोरे, जि.प.शाळा न्यु असलोद यांच्याकडून शालार्थ काम काढून पंचायत समिती शिक्षण विभागाकडे सुपुर्द करावे, तालुक्यातील अनेक शिक्षकांच्या तक्रारी प्राप्त असल्याने त्यांच्यावर तात्काळ करावी, नारायण आनंदराव पाटील जि.प.शाळा सावळदा ता.शहादा, सौ. मिना नारायण पाटील जि. प.शाळा कलसाडी ता.शहादा यांची मागील 4 वर्षांपासून स्थायित्व प्रमाणपत्र प्रलंबित असून जिल्ह्यातील इतरही शिक्षक कर्मचाऱ्यांच्या स्थायित्व प्रमाणपत्र प्रलंबित आहेत, त्यांच्या तात्काळ फाईली बनविणेबाबत, प्राथमिक शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता यादीत बऱ्याच शिक्षक बांधवांच्या नांवे क्रमवारी त्रुट्या आहेत. तरी सदर यादी दुरुस्ती करुन पुन्हा नुतनीकरण करुन प्रसिद्ध करण्यात याव्यात, सदरील शिक्षक संवर्गावर अन्याय झालेला आहे याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करुन यादी दुरुस्ती करावी, सन 2010 च्या बॅचमधील शिक्षक बांधवांचे वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव मागवुन तात्काळ निकाली काढणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक तेच शैक्षणिक उपक्रम राबविण्यात यावेत, भविष्य निर्वाह निधी खात्यावरील रक्कम उचलण्यासाठी बंद असलेली बी.डी.एस. प्रणाली पुन्हा सुरु करणे, नवापूर तालुक्यातील माहे नोव्हेंबर 2022 च्या वेतनासाठी आर्थिक तरतुद अपूर्ण आली आहे ती तात्काळ पूर्ण करणे. वरिल सर्व मागण्याचा तात्काळ विचार करुन त्या मार्गी लावाव्यात. जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी सांगितले की, सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन सहकार्य करेल असे आश्वासन पदाधिकारी यांना दिले. अन्यथा प्रहार शिक्षक संघटनेमार्फत जि.प.समोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रशासनाला प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी दिला आहे.