आई म्हाळसा देवी चॅरिटेबल ट्रस्ट सेवा समितीतर्फे सुरू असलेले भागवत सप्ताहात भागवत कथे ची सांगता व भंडारा झाला.

 


शहादा  ! Shahada/SKpublicvoice 
प्रतिनिधी /शाहिद शहा

     

    बुद्धीने विचार करणारा माणूस भावणाप्रधान होत नाही तर हृदयाने विचार करणारा माणूस हा भावना प्रधान असतो . म्हणूनच प्रेम हे हृदयातून प्रकट होते बुद्धीने नाही असे प्रतिपादन ह भ प खगेंद्र जी महाराज यांनी आई म्हाळसा देवी चॅरिटेबल ट्रस्ट सेवा समितीतर्फे सुरू असलेल्या भागवत सप्ताहात केले.
   नुकताच आई म्हाळसा देवी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे भागवत सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते. भागवत सप्ताह समारोप प्रसंगी नगरपालिकेचे माजी गटनेते मकरंद पाटील, माजी नगरसेवक लोटन धोबी, तळोदा कलाल समाजा अध्यक्ष संजय कलाल सचिव दिलीप गिरणार, जगदीश जयस्वाल, नरेंद्र बागले, जॉयट ग्रुपचे अध्यक्ष सतीश जव्हेरी उपस्थित होते.
      
           भागवत सप्ताहात प्रेम या विषय होता. ह भ प खगेंद्र महाराज यांच्या मधुर वाणीने नुकतीच  भागवत कथे ची सांगता झाली. आपल्याला मन दिलं म्हणून आपल्याला मानव म्हणतात. मनुष्य प्राणी हा मनाने विचार करत असतो. आई वडिलांवर प्रेम करा हे फक्त कथा सांगते. कथा हे प्रबोधन आहे आणि म्हणून कथेचे आयोजन होणे गरजेचे आहे. शिकवलं जातं त्याला शिक्षण म्हणतात तर स्वीकारला जात त्याला संस्कार म्हणतात. स्वीकार कसा व्हावा हे कथेच्या माध्यमातून सांगितले जाते. जे जे आपण  दिवाळीत करतो तेच मानवाचा  मृत्यू झाल्यावर देखील करतो. जसे दिवाळीत पाहुणे येतात, ढोल वाजवले जातात , फटाके फोडले जातात, दिवा लावला जातो तसाच प्रकार माणसाच्या मृत्यू झाल्यावर  होतो. म्हणून मृत्यू हा उत्सव म्हणून साजरा केला पाहिजे. आपण जीवन जगताना संस्कार रहित, धर्म आचरण करत जीवन जगले पाहिजे. नववर्ष साजरा करणे ही आपली संस्कृती नाही. नवीन वर्ष हे आपलं गुढीपाडव्यालाच असत असं देखील त्यांनी यावेळी सांगितले. आणि म्हणून काय म्हाळसादेवी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित केलेला भागवत सप्ताह हा नवीन पिढीला एक परभणीची देऊन गेला. इंग्रजी सरत्या वर्षाला भंडारा महाप्रसादाचे नियोजन हे नववर्ष साजरा करण्याला फाटा देण्याचे काम समितीने केले.
      भागवत कथेची सांगता महाआरतीने होऊन भागवत ग्रंथ हा म्हाळसादेवी मंदिरात नेण्यात  आला. नंतर भंडारा प्रसाद वाटण्यात आला. भागवत कथा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समितीचे अध्यक्ष प्रा, गणेश सोनवणे, उपाध्यक्ष डॉ विजय कलाल, सचिव विलास जावरे, खजिनदार गणेश सोनवणे, स्वप्निल पाटील, वकील पाटील, निलेश सोनार, विद्या सोनवणे , डॉ. संगीता कलाल, अजय सोनवणे , ऋषिकेश प्रकाशकर, निलेश शिंपी, प्रा. बि डी मराठे, गिरीश जावरे,भटू जव्हेरी, सागर चौधरी, मनोज जयस्वाल, अनिल सोनवणे , प्रवीण शिंपी, मनोहर निकम सह सर्व सेवेकरी बंधू भगिनींनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post