भोरगिरी (प्रतिनिधी):
भिमाशंकर अभयारण्य परिसरातील आठ गावांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत गावकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः रोजगाराच्या संधी निर्माण करणे, सामूहिक वन हक्क दावे सादर करणे व गावातील सर्वांगीण विकास या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमताने निर्णय घेण्यात आले.
ग्रामस्थांनी वनहक्क कायद्यांतर्गत प्रलंबित असलेल्या सामूहिक वन हक्क दाव्यांना गती देण्याची मागणी केली. तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
या बैठकीस वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) रंजित जाधव साहेब उपस्थित होते. त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेत संबंधित विषयांवर सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
गावांच्या विकासासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, असा एकमुखी ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला.
याबाबत माहिती भोरगिरी येथील प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते सुरेश काठे यांनी दिली.

