अल्पवयीन मुलीस पळवुन अत्याचार करणारा नराधम गजाआड करण्यात निजामपूर पोलीसांना यश...

 


साक्री प्रतिनिधी /अकिल शहा: निजामपुर पोलीस स्टेशनला दिनांक २८/०२/२०२६ रोजी तक्रारदार यांनी तक्रार दिली की, त्यांची पिडीत मुलगी वय-१५ वर्षे ०४ महिना हिला दिनांक १०/०२/२०२६ रोजी घरी कुणीही नसताना कुणीतरी अज्ञात इसमाने लग्नाचे आमिष दाखवून फुस लावुन पळवून नेले त्याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन निजामपुर पोलीस स्टेशन गुरन-०४७/२०२५ भा.न्या.सं.का.-२०२३ चे क.१३७ (२), प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यातील आरोपीचा ठावठिकाणाबाबत कोणताही सबळ पुरावा नसतांना सदर गुन्ह्याचा तांत्रीक मदतीच्या आधारे तपास करुन सदर पिडीतेचा शोध घेऊन पिडीतेच्या जबाबावरुन सदर गुन्ह्यात वाढीव कलम बी.एन.एस.क.६४,६५(१),८७सह.लै.अप.बा.सरं.अधि.-२०१२ चे क. ४,६ प्रमाणे वाढ करुन गुन्ह्यातील आरोपी नामे महेंद्र दरबार बागुल वय-२२ वर्षे रा.आयने ता. साक्री जि. धुळे निजामपुर पोलीस पथकाने ताब्यात घेतले. सदर गुन्ह्यात आरोपी नामे महेंद्र दरबार बागुल वय-२१ वर्षे रा. आयने ता. साक्री जि. धुळे यास अटक करण्यात आली असुन त्यास आरोपीतास दिनांक ०९/०३/२०२६ रोजी मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली असुन तपासादरम्यान त्याच्याकडुन गुन्हा करताना वापरलेली हिरो होंडा कंपनीची फॅशन प्रो क्र.एम.एच.१४ वाय-२४०२ हि.३०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.


सदरची कारवाई मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे, मा.डॉ. अजय देवरे, अप्पर पोलीस अधिक्षक, धुळे, मा.एस.आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि/श्री. मयुर एस.भामरे, मसपोनि/प्रियदर्शनी थोरात, पोउपनि/मधुकर सोमोसे, पोउपनि/वाय. आर. भामरे, असइ कलीम शेख, पोहेकॉ/नारायण माळचे, पोहेकों/आर.यु. मोरे, पोहेकॉ/प्रशांत ठाकुर, पोहेकॉ/प्रदीपकुमार आखाडे, पोकों/परमेश्वर चव्हाण, पोकों/श्रीराम पदमर, पोकों/सुनिल अहिरे, पोकों/सागर कांगणे, पोकों/राकेश महाले, पोकों/दिपक महाले, पोकों/गौतम अहिरे, पोकों/कृष्णा भिल, पोकों/सागर थाटशिंगारे, चापोकों/मोहन माळी, यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post