पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय क्रीडा व कला अविष्कार स्पर्धेत भाडणेतील शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थिनीचे घवघवीत यश...



साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचलित अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला मुलींच्या शासकीय निवासी शाळांच्या दिवे ता. पुरंदर जि. पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय कला व क्रीडा अविष्कार स्पर्धेत शासकीय निवासी शाळा भाडणे ता. साक्री जिल्हा धुळे येथील विद्यार्थीनींनी घवघवीत यश संपादित केले.





माननीय प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण नाशिक विभाग आदरणीय श्री. माधवजी वाघ साहेब यांच्या प्रेरणेतून तसेच माननीय सहायक आयुक्त समाज कल्याण धुळे आदरणीय श्री संजयजी सैंदाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 14 वर्षाखालील लांब उडी स्पर्धेत वेदश्री दयाराम मोरे(इयत्ता 7 वी )हिने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला तसेच वेदश्री ने 100 मीटर धावणे स्पर्धेत राज्यस्तरावर तृतीय स्थान पटकावले.17 वर्षाखालील मुलींच्या 200 मीटर धावणे स्पर्धेत (विभागात द्वितीय आलेल्या विद्यार्थिनींमध्ये ) प्रिया गंगाधर साळवे(इयत्ता 9 वी )हिने राज्यस्तरावर प्रथम स्थान पटकावले. तसेच 400 मीटर धावणे ( विभागात द्वितीय आलेल्या विद्यार्थिनींमध्ये ) वेदश्री दयाराम मोरे हिने प्रथम स्थान पटकावले. 17 वर्षाखालील मुलींच्या खो-खो स्पर्धेत राज्यस्तरावर नाशिक विभागातर्फे खेळतांना प्रिया गंगाधर साळवे, मीनाक्षी पंढरीनाथ साळवे,(इयत्ता 9वी) उज्वला धवळू गायकवाड (इयत्ता 10 वी) या तिघींनी कौशल्यपूर्ण खेळी करत नाशिक विभागाला नागपूर विभागाविरुद्धच्या सामन्यात विजयश्री खेचून आणण्यात मोलाची कामगिरी केली. तसेच सदर पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिक विभागाला द्वितीय क्रमांकाची जनरल चॅम्पियनशिप घोषित करण्यात आली. यानिमित्ताने प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ साहेब तसेच सहाय्यक आयुक्त सैंदाणे साहेब यांनी मुलींचे विशेष कौतुक केले.

सदर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थिनींना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मालती सोनवणे यांनी प्रोत्साहन दिले. सर्व यशस्वी विद्यार्थीनी खेळाडूंचे शासकीय निवासी शाळा भाडणे येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post