साक्री प्रतिनिधी / अकिल शहा: साक्री शहरातील राम मंदिर येथे श्री संत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व परीट समाजाचे ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले प्रतिमाचे पूजन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झाले. मोहन शिंदे, एकनाथ सोनवणे, रामदास देवरे, आत्माराम निंबा चव्हाण, काकुस्ते, कचरू मोरे, गटलू चव्हाण आदीच्या हस्ते प्रतिमेला पूजन करण्यात आले .
यावेळी भव्य रॅली चे ही आयोजन करण्यात आले होते श्रीराम मंदिर, सुभाष चौक,ओम शांती स्टोअर्स, लक्ष्मी रोड, विजय मशिनरी,संतोषी माता मंदिर, मेन रोड या मार्गाने परत श्री राम मंदिर येथे समाप्त करण्यात आली यावेळी समाजाचे अध्यक्ष भूषण चव्हाण, उपाध्यक्ष निलेश भामरे, खजिनदार संदीप चव्हाण, सचिव दिनेश शिंदे, रोशन ईशी, देविदास चव्हाण, दिनेश शिंदे,संदीप चव्हाण,निंबा मोरे, भैय्या चव्हाण,दिनेश चव्हाण, प्रशांत सोनवणे, विनोद चव्हाण, संजय चव्हाण,मुकेश चव्हाण, समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते थोर संत गाडगे महाराज यांच्या जीवन चरित्रावर सानवी दिपक शिंदे या लहानशा चिमुकलेने आपले मनोगत व्यक्त क समाजाच्या लोकांनी आपले मनोगत व्यक्त केले व तसेच अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी समाज बांधव व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

