दोन सुवर्ण, दोन रौप्य पदकांसह राहुल सुळेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव...

 


शहादा प्रतिनिधी /सोनू गावीत 

शहादा येथील Achiver Heights International School, Shahada, जि. नंदुरबार येथे आयोजित वार्षिक क्रीडा दिन २०२५–२६ कार्यक्रमात कु. राहूल सुनिल सुळे याने उल्लेखनीय क्रीडा कामगिरी करत ‘Best Athlete of the Year’ (शाळेतील ऐकमेव सर्वोत्कृष्ट खेळाडू) हा मान पटकावला.

क्रीडा दिनाअंतर्गत झालेल्या विविध स्पर्धांमध्ये राहुल सुळे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत

१०० मीटर धावणे – प्रथम क्रमांक,

व्हॉलीबॉल – प्रथम क्रमांक,

टेबल टेनिस – द्वितीय क्रमांक,

शॉटपुट – द्वितीय क्रमांक

अशी घवघवीत यशस्वी कामगिरी नोंदवली.

या उल्लेखनीय यशाबद्दल राहुल सुळे यास ट्रॉफी, दोन सुवर्ण पदके व दोन रौप्य पदके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमावेळी उपस्थित शिक्षक, पालक, क्रीडाप्रेमी व विद्यार्थ्यांनी त्याच्या यशाचे कौतुक केले.

यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, परिश्रम, शिस्त आणि जिदीच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते. निरोगी जीवनशैली व शारीरिक तंदुरुस्तीकरिता खेळ विद्यार्थीजिवनात अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. राहुल सुळेची ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post