निजामपूर पोलिसांची दमदार कामगिरी;जामदा गावातील कुख्यात दरोडेखोराच्या आवळल्या मुसक्या....

 



साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील पेटले गावाचे पुढे जामदा गावाच्या शिवारात दिनांक २८/०८/२०२५ रोजी १२.०० वाजेच्या सुमारास सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस प्रा.ली. कंपनीचे टॉवरच्या जवळ स्वस्त दरात स्क्रैप घेणेसाठी बोलावुन फिर्यादीस हाताबुक्यांनी व त्यांच्या जवळील लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्यांचेकडुन १,६९,७००/- रुपये लुटले म्हणुन त्यावरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुरनं २३०/२०२५ बीएनएस कलम ३१० (२) प्रमाणे दि.२८/०८/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदरच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे आरेश शंकिलाल पवार ऊर्फ भोसले हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता.


सदर आरोपीवर निजामपुर पोलीस स्टेशन तसेच इतर पोलीस स्टेशनला दाखल गुन्हे खालीलप्रमाणे :-

१) निजामपुर पोलीस स्टेशन गुरन २४३/२३ भादवि ३९५, प्रमाणे,

२) निजामपुर पोलीस स्टेशन गुरन १०५/२४ भादवि क ३९५, प्रमाणे,

३) निजामपुर पोलीस स्टेशन गुरन १९१/२०२५ भा.न्या.सं.क.३०९ (४),११५ (२), ३५१(२), ३५१ (३), प्रमाणे,

४) निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुरनं २३०/२०२५ बीएनएस कलम ३१० (२) प्रमाणे

५) पश्चिम देवपुर पोलीस स्टेशन गुरन ३७२/२०२५ भा.न्या.सं.क. ३१० (४) प्रमाणे,

६) नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन गुरन ०२५९/२०२५ भा.न्या.सं.क. ३१०(२),११५ (२), ३५१(२), प्रमाणे,

७) नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन गुरन ०३८१/२०२५ भा.न्या.सं.क.३१० (४), अन्वये.

८) सुरत गुजराथ राज्य येथील गुरन ११२/००२२५१९८४/२०२५. अन्वये

असे वरीलप्रमाणे गुन्हे दाखल असून तसेच सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सपोनि/मयुर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय व तांत्रीक माहितीच्या आधारे तपासावरुन नमुद गुन्हयातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मुख्य दरोडेखोर आरोपी आरेश शंकिलाल पवार ऊर्फ भोसले रा. जामदा ता. साक्री जि.धुळे याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन त्यास मा. न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली असुन तो सद्या पोलीस कोठडी रिमांडमधे आहे. सदर आरोपीताकडुन तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेली KTM कंपनीची मो.सा. तसेच कॉपर केबल असा एकुण १,६८,०००/- रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच त्यांचेकडुन गुन्ह्यातील इतर आरोपीतांचा शोध सुरु आहे.

सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे, मा. डॉ. अजय देवरे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा. एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि/श्री मयूर भामरे, सपोनि/प्रियदर्शनी थोरात, पोउपनि/यशवंत भामरे, पोउनि/मधुकर सोमासे, असई/कलीम शेख, पोहेकों/नारायण माळचे, पोहेकों/रतन मोरे, पोहेकों/नागेश्वर सोनवणे, पोहेकों/प्रदिप आखाडे, पोना/खंडेराव पवार, पोकों/दिपक महाले, पोकों/राकेश महाले, पोकों/गौतम अहिरे, पोकों/मुकेश दुरगुडे, पोकों/पृथ्वीराज शिंदे, राकेश बोरसे, पोकों/सुजीत देवरे, पोकों/अर्जुन पवार, पोकों/सागर थाटसिंगारे, पोकों/कृष्णा मिल, पोकों/परमेश्वर चव्हाण, पोकों/सुनिल अहिरे, पोकों/अर्जुन पवार, पोकों/टिलु पावरा, पोकों/श्रीराम पदमर, चापोकों/मोहन माळी यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post