नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/शेख अहमद
आज मंगळवार, दि. 20 जानेवारी 2026 रोजी शहादा येथील सुफ्फा व इकरा उर्दू शाळेत विज्ञान, गणित व हस्तकला विषयांचे संयुक्त प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या प्रदर्शनात इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून एकूण 445 प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. प्रा. रियाज अली सैय्यद सर (यंग सायन्टिस्ट – 2008, भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर; 2011 भारत सरकार पुरस्कारप्राप्त) उपस्थित होते. प्रदर्शनाचे उद्घाटन मा. जाकीर मियाँ जहाँगीरदार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक विभाग – राज्य उपाध्यक्ष) यांच्या शुभहस्ते पार पडले.हस्तकला विभागाचे उद्घाटन श्रीमती प्रविणा राजेश कुलकर्णी मॅडम (संचालिका, महिला मंडळ) यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. जगदीश पाटील सर (शहादा तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष व आदर्श शिक्षक), मा. सुधाकर सैंदाणे सर (तालुका सचिव), तसेच श्रीमती हेमलता पाटील मॅडम (विज्ञान शिक्षिका, विकास हायस्कूल शहादा) उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात प्रा. रियाज सैय्यद सरांनी विद्यार्थ्यांना विज्ञान व गणित विषयात प्राविण्य मिळवण्यासाठी जिज्ञासा, प्रयोगशीलता व सातत्याचे महत्त्व अधोरेखित करत मोलाचे मार्गदर्शन केले.या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी जलसंधारण, पर्यावरण संरक्षण, सौरऊर्जा, पर्जन्यमापन, वाहतूक व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य व स्वच्छता अशा विविध विषयांवर आधारित प्रयोग व मॉडेल्स सादर केली. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगांचे प्रात्यक्षिक अत्यंत आत्मविश्वासाने व शास्त्रीय पद्धतीने मांडले.
प्रदर्शनासाठी शोएब सर, फरहान सर, सईद सर, शाकीब सर, तौसीफ सर, मुजीब सर व वसीम खान सर यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व वैज्ञानिक मांडणीचे विशेष कौतुक केले. उत्कृष्ट प्रयोग सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमास संस्था अध्यक्ष मा. मुन्ना भाई कादरी साहेब, कार्याध्यक्ष मा. ईश्वरभाऊ पाटील, उपाध्यक्ष मा. तनवीर भाई बोरदवाला, सचिव मा. डॉ. नाजीम तेली, मा. जाकीर भाई मनियार, मा. सुरेशभाऊ चव्हाण, सुफ्फा शाळेचे मुख्याध्यापक मा. जव्वाद अली सर व इकरा माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक राहील खान सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तनवीर खान सर यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान, गणित व हस्तकला समिती तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

