साक्रीत गुरव समाज उन्नती संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न....

 


साक्री प्रतिनिधी /अकील शहा: गुरव समाज उन्नतीसंस्था कार्यक्षेत्र गुजरात,मध्य प्रदेश यांच्यावतीने दि.२५ डिसेंबर गुरुवारी रोजी साक्री शहरातील चंद्रकांत मंगल कार्यालयात गुरव समाजाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री योगेश महेंद्र दास पवार होते .जनरल सेक्रेटरी श्री हेमंत मधुकर गुरव अध्यक्ष श्री गणेश नंदकुमार गुरव कोषाध्यक्ष शशिकांत मेघराज गुरव, ट्रस्टी श्री जितेंद्र गुलाबराव गुरव, सचिव शिक्षण समिती श्री उमाकांत हिरालाल गुरव, चेअरमन शिक्षण समिती विश्वस्त मंडळ उपाध्यक्ष सहसचिव हिशोब तपासणी प्रसिद्धीप्रमुख सर्व समिती चेअरमन सल्लागार सर्व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.गुरव समाज उन्नती संस्था मध्यवर्ती कार्यालय धुळे ,कार्यक्रमाची सुरुवात संत काशिबा महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून सुंदर अशा गायनाने झाली. विद्यार्थ्यांचा विकास कौशल्य प्रगती व्हावी भविष्यात त्यांना एक चांगले व्यासपीठ मिळवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा हेतू समोर ठेवून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे मान्यवरांकडून सांगण्यात आले.सत्कार उन्नती संस्थेचे विवाह समिती अध्यक्ष तात्यासो दिलीप गुरव साक्री दीपक सोनवणे अनिल जाधव अनिल पवार हर्षल गुरव ऋषिकेश जाधव यांच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात साडेतीनशे विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले अध्यक्ष भाषणात साक्री तालुका गुरव समाज च्या वतीने श्री दीपक जगन्नाथ गुरव यांनी सर्वांचे आभार मानले करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post