साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: पिंपळनेर शहरातील शाळा व महाविद्यालयात परिसरातील विद्यार्थी,विद्यार्थिनी बसने शाळा कॉलेजला येत असतात व बसस्थानकापासुन ते आपआपल्या शाळा-कॉलेजात पायी जात असतात त्यावेळी कॉलेज मुली व शाळकरी मुलींना रोडरोमिओ कडुन त्रास देण्याच्या घटना अलिकडील काळात दिनांक १५.१२.२०२५ रोजी सकाळी ०६.३० वाजेच्या सुमारास अशाच प्रकारे पिंपळनेरातील आ.मा.पाटील कॉलेज या ठिकाणी कॉलेज ला येणाऱ्या मुलींची रोडरोमियांनी कॉलेज जवळ त्यांची छेड काढली होती. त्याअनुशंगाने प्राप्त तक्रारीवरुन पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे गुरन २८३/२०२५ भारतीय न्याय सहिता कलम ७८,७९ सह पोक्सो कायदा कलम ११ चे शिक्षा १२ प्रमाणे गुन्हा नोंद होता. व त्यातील आरोपीत नामे-१) चंद्रकांत विजय निकुंभ २) विशाल अर्जुन भामरे, ३) सुधीर जयसिंग पवार तिन्ही रा.पिपंळनेर ता.साक्री जि. धुळे हे घडला घडलेपासुन फरार होते.
तसेच दिनांक १६.१२.२०२५ रोजी कॉलेज सुटल्यानंतर बसस्थानकडे जात असतांना शहरातील काही रोडरोमिओज यांनी पुन्हा मुलीची छेड काढली त्यावरुन पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे गुरन २८४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ७८,७९ सह पोक्सो कायदा कलम ११ चे शिक्षा १२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यातील आरोपीत नामे- १) राहुल अर्जुन भामरे, २) गणेश सुपेकर दोन्ही रा. पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे. हे देखील सदर गुन्हा दाखल झालेपासुन फरार होते.
त्याअनुषंगाने मा. वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे तात्काळ आरोपीतांना जेरबंद करणेकामी पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे दोन पथक स्थापन करण्यात आले होते. व स्थानिक गुन्हे शाखा येथे देखील स्वतंत्र पथक स्थापन केले होते.
त्यानुसार दिनांक १६.१२.२०२५ रोजी सायंकाळी ०६,०० वाजेच्या सुमारास तांत्रिक पुराव्याचे आधारे यातील आरोपीत नामे चंद्रकांत विजय निकुंभ व राहुल अर्जुन भामरे यास पिंपळनेर पोलीस स्टेशन पथक व स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी संयुक्त कारवाई करुन त्यांना नंदुरबार व धुळे येथुन ताब्यात घेवुन त्यांना जेरबंद करण्यात आले. तसेच काल दिनांक १८.१२.२०२५ रोजी आरोपीताचा शोध घेणे कामी गुजरात राज्यातील बडोदा येथे आरोपीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन पोलीसांचे पथक रवाना करण्यात आले होते. त्यांनुसार गुन्ह्यातील फरार आरोपीत नामे-विशाल अर्जुन भामरे, व सुधीर जयसिंग पवार, हे बडोदा शहरातील अलिशान लॉजमध्ये लपुन बसले होते. त्यांना ताब्यात घेवुन पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री श्रीकांत धिवरे सो.मा.अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे सो, पोलिस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्रीराम पवार सो, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक दिपक वळवी साक्री पोस्टे, पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी किरण बर्गे, सपोनि मयुर भामरे, निजामपुर पोस्टे, सपोनि नामदेव सहारे स्थागुशा, सपोनि/अनिल बागुल साक्री पोस्टे, पोसई/विजय चौरे, पोसई/भुषण शेवाळे, पोसई/संदिप संसारे, अपोसई/शिरसाट,पोसई/संजय पाटील स्थागुशा, असई कांतीलाल अहिरे, पोहेकॉ सदेसिंग चव्हाण, पोकों/रविंद्र सुर्यवंशी, पोकों/पंकज वाघ, पोकों/अतुल निकम स्थागुशा, पोकों/सोमनाथ पाटील, पोकों/विजय पाटील, पोकों/योगेश महाले, पोकों/प्रविण धनगर, पोका/संदिप पावरा. यांनी केली आहे.
