शहाद्यात आज अण्णासाहेबांना अभिवादनासह पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन...!


शहादा प्रतिनिधी/प्रफुल्ल साने:
थोर स्वातंत्र्य सेनानी, माजी आमदार अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त गुरूवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या प्रशासकीय कार्यालयासमोरील स्मारकस्थळी अभिवादनासह अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर विश्वेश्वरैय्या सभागृहात पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

      परिसराचे भाग्यविधाते, थोर स्वातंत्र्य सेनानी, सहकार व शिक्षण महर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक 18 सप्टेंबर रोजी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या प्रशासकीय भावना समोरील स्मारकस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रम प्रसंगी मंडळाच्या सचिव श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहील.तद्नंतर श्री.पी.के.अण्णा पाटील फाउंडेशन व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने डी. एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर विश्वेश्वरय्या सभागृहात सकाळी 9:30 ते दुपारी 5 या वेळेत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी स्वदेशी-स्वभाषा-स्वराज्य, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची ज्ञानसाधना, पर्यावरण संवर्धनात युवकांची भूमिका, जगाची तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल-वैश्विक अर्थव्यवस्थेच्या कट,निसर्ग कोपतो की माणूस चुकतो यापैकी एका विषयावर मराठी , हिंदी व इंग्रजी भाषेतून मत मांडता येणार आहे. यशस्वी स्पर्धकांना प्रथम पारितोषिक 10000 रुपये, द्वितीय पारितोषिक 7000 रुपये, तृतीय पारितोषिक 5000 रुपये (स्पर्धक व महाविद्यालय यांना विभागून) तसेच उत्तेजनार्थ प्रत्येकी एक हजार रुपयांची दोन पारितोषिक दिले जाणार आहेत.स्पर्धा उद्घाटन सोहळा मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील यांच्या हस्ते व उपस्थितीत करण्यात येईल. स्पर्धेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील व श्री.पी.के. अण्णा पाटील फाउंडेशनचे सचिव प्रा.मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विश्वास पाटील, कार्याध्यक्ष डॉ. एस. पी. पवार, डॉ.आर.एस.पाटील यांच्यासह समितीचे सदस्यांनी नियोजन केले आहे,अशी माहिती प्राचार्य डॉ.एम.के.पटेल यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post