मोराणे प्रतिनिधी/प्रकाश नाईक :समता शिक्षण संस्था, पूणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे, धुळे येथील विद्यार्थ्यांनी दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी ललित कला भवन, जळगाव येथे आयोजित महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय, जळगाव अंतर्गत सन २०२५-२६ गटस्तरीय महिला नाट्य महोत्सवात महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या संघाला महिला नाट्यात तृतीय क्रमांक, प्रतिभा बैसाणे या विद्यार्थिनीला उत्कृष्ट कलाकार म्हणून द्वितीय क्रमांक आणि प्रा. डॉ. मेघावी मेश्राम यांनी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी महाविद्यालयात आयोजित एक दिवसीय विद्यापीठ स्तरीय स्पर्धा परीक्षा जागरूकता आणि मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य. मा. डॉ. विष्णू गुंजाळ उद्घाटक मा. डॉ.अजय सुरवाडे (संचालक डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र,क. ब. चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव), मा. नितीन ठाकूर (अधिसभा सदस्य, क. ब. चौ. उ.म.वी, जळगाव) आणि प्रा.दिलीप चव्हाण(लक्ष अकॅडमी चाळीसगाव) या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
